Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : लाईनमनच्या मृत्युनंतर वीजमंत्र्यांवर टीकेचे बाण; व्हाळशीतील दुर्घटना

Bicholim News : फॅक्‍टरीचा इन्‍व्‍हर्टर सुरू झाल्‍यामुळे त्‍याचा विद्युतप्रवाह लाईनमन काम करत असलेल्‍या ठिकाणी आला, असे कारण वीज खात्‍याकडून देण्‍यात आले आहे. या दुर्घटनेमुळे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या खुर्चीला हादरे बसू लागले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, खांबावर चढून दुरुस्तीकाम करताना विजेचा शॉक बसल्याने एका लाईनमनचा दुर्दैवीरित्या अंत झाला. ही दुर्घटना आज (शुक्रवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास व्हाळशी येथे मुख्य रस्त्यावर घडली. मनोज जांबावलीकर (वय ३५ वर्षे) असे मृत लाईनमनचे नाव आहे.

फॅक्‍टरीचा इन्‍व्‍हर्टर सुरू झाल्‍यामुळे त्‍याचा विद्युतप्रवाह लाईनमन काम करत असलेल्‍या ठिकाणी आला, असे कारण वीज खात्‍याकडून देण्‍यात आले आहे. या दुर्घटनेमुळे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या खुर्चीला हादरे बसू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उत्तर गोव्यातील निषेध केला असला, तरी खलप मुख्यमंत्र्यांना कोणत्या शब्दांत प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नैतिकता पाळून वीज मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करताना खलप यांनी २०१९ ते २४ या काळात वीज धक्क्याने ७१ जणांचा मृत्यू झाल्याकडेही लक्ष वेधले आहे.

१२ हजार कोटी खर्चूनही दुर्घटना कायम

वीजमंत्री ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत माहिती दिली होती की, राज्य सरकारने गेल्या ५ वर्षांत वीज वितरण प्रणाली सुधारण्यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. एवढा मोठा खर्च करूनही लोकांचे मृत्यू सुरूच असून लोकांना वीज टंचाईचाही सामना करावा लागत आहे. ‘मिशन टोटल कमिशन’वर डोळा ठेवून अवाढव्य खर्च करण्यालाच भाजप सरकारचे प्राधान्य आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

पायाभूत सुविधा कोलमडल्या

गोव्यात पायाभूत सुविधा कोलमडल्या आहेत. उद्योगपती, व्यापारी आस्थापने आणि सरकारी विभाग यांच्याकडून अनेक कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. पण दोन महिन्यांसाठी गरीब लोकांचे ५०० रुपये वीज बिल चुकल्यास सरकार त्यांचे कनेक्शन तोडण्याची तत्परता दाखवते. भ्रष्ट भाजप सरकारपासून गोवा मुक्त करण्याची वेळ आली आहे. कामावर असताना कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सर्वांनी त्यांना कायमचा धडा शिकवूया, असे खलप म्हणाले.

जमाव आक्रमक:

या दुर्घटनेनंतर घटनास्थळी पिळगावातील लोक मोठ्या संख्येने जमले. या घटनेला वीज खातेच जबाबदार असल्याचा दावा जमावाने केला. वीज खात्याचे अधिकारी येऊन स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

मृतदेहाची दोन तास परवड :

संतप्त युवक आणि नागरिक पोलिस अधिकारी वा अन्य कोणाचेच ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. जवळपास दोन तासांनंतर वीज खात्याचे साहाय्यक अभियंता वल्लभ सामंत अन्य अधिकाऱ्यांसह घटनास्थळी आले. जांबावलीकर कुटुंबाला न्याय देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर जमाव काहीसा शांत झाला. तोपर्यंत मृतदेहाची परवड झाली.

५ वर्षांत ७१ व्‍यक्‍तींचा शॉक लागून मृत्‍यू

पणजी, व्हाळशी - डिचोली येथे वीजवाहिनीवर काम करणारे लाईनमन मनोज जांबावलीकर यांच्या अपघाती मृत्यूमुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. निवडणुकीच्या तोंडावर लाईनमनचा मृत्यू झाल्याने त्याआधारे ढवळीकर यांना लक्ष्य करण्‍याची संधी विरोधक सोडत नसल्याचे दिसत आहे. समाज माध्यमांवर सरकारविरोधी रोषाला लोक यानिमित्ताने वाट करून देत आहेत. पाच वर्षांत ७१ व्यक्तींचा व ३० गुरांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे , असे खलप म्हणाले.

दोनच दिवसांपूर्वी खलप यांची अक्कलहुशारी ढवळीकर यांनी वर काढली होती. खलप जर एवढे हुशार तर म्हापसा अर्बन बॅंक कशी बुडाली, अशी खोचक विचारणा ढवळीकर यांनी केली होती.

तो वाद मिटतो न मिटतो, तोच मुख्यमंत्र्यांनी म्हापसा अर्बनची फाईल पुन्हा उघडी करू, असा इशारा देत खलप यांना बॅकफूटवर जाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT