Ganpati Visarjan Dainik Gomantak
गोवा

Ganpati Visarjan 2022: बाप्पांचे उत्साही वातावरणात विसर्जन, निर्माल्याची समस्या कायम

Ganesh Visarjan: यंदाही विसर्जनस्थळी निर्माल्य जमा बहुतेक भागात कोणतीच उपाययोजना नाही

दैनिक गोमन्तक

Bicholim Ganesh Visarjan: डिचोलीतील बहुतेक भागात विसर्जनस्थळी निर्माल्य जमा करण्यासाठी कोणतीच उपाययोजना नसल्याने यंदाही विशेष करून ग्रामीण भागात निर्माल्य विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली. डिचोलीतील विविध भागात दीड आणि पाच दिवसांच्या गणपती ''बाप्पा''चे उत्साही वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे. तरी काही भागात यंदाही निर्माल्याच्या विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली.

बहुतेक भागात विसर्जनस्थळी निर्माल्य जमा करण्यासाठी ''निर्माल्य कुंभ'' आदी कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे गणपती मूर्तींचे विसर्जन (Ganpati Visarjan) करतानाच गणेशभक्तांनी निर्माल्य पाण्यात सोडले. नदीत सोडलेले निर्माल्य पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. मात्र काही ठिकाणी तलाव, ओहोळ याठिकाणी मात्र हे निर्माल्य अडकून राहिल्याचे दिसून येत आहे.

कृत्रिम तळे ''निर्माल्य'' विरहित

''कृत्रिम तळ्यात'' गणपती विसर्जनाची संकल्पना यशस्वी ठरली. यंदाही या तळ्यात गणपती मूर्तींचे विसर्जनही करण्यात आले. विसर्जनस्थळी जमा झालेल्या निर्माल्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आल्याने या कृत्रिम तळ्याच्या ठिकाणी निर्माल्याची कोणतीच समस्या निर्माण झालेली नाही.

* निर्माल्याचा वापर झाडांच्या खतासाठी-

गृहनिर्माण वसाहतीतील गणेशभक्तांची गणेश विसर्जनावेळी होणारी अडचण लक्षात घेऊन गणेशभक्तांच्या सहकार्यातून वसाहतीतील कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जित करताना कोणतेही प्रदूषण polution)( होणार नाही याची गणेशभक्तांनी पूर्णपणे दक्षता घेतली होती. निर्माल्य तळ्यात न सोडता हे निर्माल्य गृहनिर्माण वसाहतीतील झाडांना वापरले आहे. या निर्माल्यापासून झाडांना सेंद्रिय खत (Organic Compost) मिळणार असल्याचा दावा गणेशभक्तांनी केला आहे.

विजयकुमार नाटेकर, नगरसेवक, डिचोली-

कृत्रिम तळ्यात विसर्जित करण्यात आलेल्या गणपतीच्या मूर्ती पूर्णपणे विरघळल्यानंतर माती तळ्याबाहेर काढण्यात येणार आहे. ही माती मातीपासून कलाकृती करणाऱ्या मातीकाम कलाकाराला देण्यात येणार आहे. तळेही कोरडे ठेवण्यात येणार आहे. ''कृत्रिम तळ्या'' पासून कोणतेच प्रदूषण होणार नाही. त्यासाठी गणेशभक्त आणि पालिकेचे सहकार्य मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

Goa Cable Issue: ..अखेर मार्ग मोकळा! वीज खांबांवरील केबल्स कापल्या जाणार; गोवा खंडपीठाचा स्थगितीस नकार

SCROLL FOR NEXT