वास्को: गोवा राज्यात पाच दिवसांच्या गणरायाला रविवारी मोठ्या भक्तीभावाने निरोप देण्यात आला.'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' सुमधूर भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. असा जयघोष व फटाके आतषबाजीच्या संगतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. (Bid farewell to five days of Ganaraya in Goa today)
राज्यातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला बुधवारी प्रारंभ झाला होता. विधीवत पूजा करत घरोघरी श्रीगणेशाचे आगमण झाले होते. मग दुसऱ्या दिवशी प्रत्येकाने एकमेकांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. तसेच आज पाचव्या दिवशीही दुपारी घुमट आरती करण्यात आली.सायंकाळी 5 ते 6 वाजल्यापासून गणेश विसर्जनास प्रारंभ झाला. विधिवत उत्तरपूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या.
अलिकडच्या काळात बहुतेकांच्या घरी किमान एकतरी चारचाकी वाहन असल्यामुळे विसर्जनासाठी मूर्ती डोक्यावर घेऊन जाण्याची परंपरा कालबाह्य होऊ लागली आहे. तरीही अनेक ग्रामीण भागात भाविकांनी मूर्ती डोक्यावरून घेऊन विसर्जनस्थळी नेण्यात आल्या. त्यावेळी घुमट आरतींच्या बैठका, महिलांतर्फे फुगड्या,दिंडी, दारुकामाची आतषबाजी असे चित्र दिसून आले. शहरी तसेच ग्रामीण भागात पोलिसांची उपस्थिती होती.
तसेच ग्रामपंचायती, नगरपालिका प्रतिनिधी यांच्यातर्फे विसर्जन ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, वास्कोत अनेक ठिकाणी पाच ते अकरा दिवस तर काही ठिकाणी 21 दिवसपर्यंतही गणशोत्सव साजरा करण्यात येतो.वास्कोत बायणा समुद्रकिनारी खारीवाडा येथे समुद्रकिनारी तसेच वाडे तळ्यात गणपती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी उफळली होती. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका चालू होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.