Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident : डिचोलीत दुचाकींची धडक; युवक गंभीर जखमी

Bicholim Accident : डिचोलीतील घटना : उपचारासाठी गोमेकॉत दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Accident :

डिचोली येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (रविवारी) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुस्लिमवाडा-डिचोली येथे मुख्य रस्त्यावर झाला. या अपघातात स्कुटरस्वार युवक गंभीर जखमी झाला.

त्याच्या डोक्याला मार बसला असून त्याचा उजवा पाय मोडला आहे. तर कुडासे-महाराष्ट्र येथील बबन नामक मोटारसायकलस्वारही जखमी झाला आहे. मोटारसायकलवर मागे बसलेली त्यांची पत्नी मात्र या अपघातातून सुखरुप बचावली आहे. दोघांही जखमींवर डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातात पाय मोडलेला युवक डिचोली परिसरातीलच आहे. कुडासे येथील बबन हे एमएच-०७-एम-५६९४ या मोटारसायकलवरुन डिचोलीच्या दिशेने जात होते. मुस्लिमवाडा येथे मशिदीसमोर पोचताच समोरून येणाऱ्या जीए-०३-टी-५४३४ या स्कुटरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली कोसळले. यात दाेन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, डिचोली पोलिसांनी तातडीने धाव घेत अपघाताचा पंचनामा केला.

रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही

अपघातानंतर स्थानिकांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र रुग्णवाहीका उपलब्ध होऊ शकले नाही. अर्ध्या तासाहून अधिक वेळ वाट पाहूनही रुग्णवाहिका अपघातस्थळी आली नाही. अखेर जखमींना खासगी वाहनातून डिचोलीच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. डिचोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. ते पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update:सकाळी 10 पर्यंत पाळीत सर्वाधिक, तर ताळगावमध्ये सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT