Goa Bhutani Project Dispute Canva
गोवा

Bhutani Project: डोंगर जपा, विकू नका! सांकवाळ पंचायत 'भुतानी'विरुद्ध आक्रमक

Bhutani Infra Project: बैठकीत उपस्थित सर्व पंच सदस्यांनी एकमताने प्रमेश कंट्रक्शन भूतानी इन्प्राच्या प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Bhutani Infra Project Sancoale Panchayat Meeting

वास्को: सांकवाळ येथील प्रस्तावित भूतानी प्रकल्पाला आज पंचायत बैठकीत कडाडून विरोध करण्यात आला. येथील डोंगराळभाग जपा, दिल्लीवाल्यांना विकू नका, असा सूर व्यक्त करण्यात आला.

सांकवाळ (Sancoale) पंचायतीच्या बैठकीत उपस्थित सर्व पंच सदस्यांनी एकमताने प्रमेश कंट्रक्शन भूतानी इन्प्राच्या प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर बैठकीला सरपंच रोहिणी तोरस्कर, पंच अनुषा लमाणी, गिरीश पिल्ले, संतोष देसाई, डॅरिक वालिस, वॅलेटिनो रॉड्रिगीस, जसिया कादर, मारिया पॉवलिना आझावेदो, निधी नाईक, मॉव्हिलो काव्हालो, तुळसीदास दत्ता नाईक, ग्राम सेवक सचिव ओरविल वालिस व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठक सुरू होताच विरोधी पंच सदस्य तुळसीदास नाईक यांनी भूतानी इन्फ्रा प्रकल्पाला दिलेला परवाना मागे घेण्याची मागणी केली. यावेळी विरोध पंच सदस्य मॉव्हिलो काव्हालो, निधी नाईक, मारिया पॉवलिना आझावेदो यांच्यांनी सुद्धा भूतानी इन्फ्रा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. सदर बैठकीत बेकायदेशीररित्या एक वकिल पंच सदस्यांच्या जागेवर बसून सत्ताधारी पंचाना मार्गदर्शन करीत होता. त्याला पंच तुळसीदास नाईक यांनी आक्षेप घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

अग्रलेख: भारतात पावसाच्या एका तडाख्यातच डांबर, खडी, सिमेंट अदृश्य का होऊन जाते?

Goa Today's News Live: फोंड्यात थंड पेयाच्या सीलबंद बाटलीत आढळली मिरची पूड

SCROLL FOR NEXT