Bhoma road widening Dainik Gomantak
गोवा

Bhoma Road: 'गावातून महामार्ग नकोच, बगलमार्ग हवा'; भोमवासीयांचा विरोध झुगारुन रुंदीकरणासाठी मोजमाप

Bhoma Demarcation: भोम ते जुने गोवे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ वरील ७ कि. मी. लांबीच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने १ हजार ६०.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: भोम येथील नियोजित चौपदरी रस्त्याच्या कामाचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (२२ एप्रिल) सकाळी मोजमाप केले. परंतु ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करून 'गावातून महामार्ग नकोच, बगलमार्ग हवा' असा अशी मागणी पुन्हा लावून धरली. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.

कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भोमच्या ग्रामस्थांसमवेत काल सोमवारी मंत्रालयात बैठक घेऊन भोम गावातील नियोजित चौपदरी रस्ता कामासंबंधी चर्चा केली होती.

ते ३६ प्लॉट कुणाचे?

भोम गावात बेकायदेशीररीत्या तयार करण्यात आलेले ते ३६ प्लॉट कुणाचे? असा सवाल ग्रामस्थ संजय नाईक यांनी केला. स्वतःच्या फायद्यासाठी गावाची संस्कृती नष्ट करू नका. आम्ही भोम गावाचे अस्तित्व नष्ट होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने केला.

दरम्यान, भोम येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा विषय आता बगलमार्गावर घसरला आहे. उड्डाणपुलाऐवजी बगलमार्ग हवा अशी मागणी भोमवासीयांनी पुढे आणली असून बगलमार्ग बांधणे शक्य नाही, असे सरकारने सोमवारी (२१ एप्रिल) स्पष्ट केले होते. भोममधील ७० जणांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेले सादरीकरण पाहिले. यावेळी प्रकल्पाचा सविस्तर आराखडा गावकऱ्यांना दाखविण्यात आला.

केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ७ एप्रिल रोजी जाहीर केले की, भोम ते जुने गोवे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ वरील ७ कि. मी. लांबीच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने १ हजार ६०.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT