Konkan Railway: 'बेकायदा मांसपुरवठा व्यापार सुरू राहण्यासाठी दरमहा 25,000 दे', लाच घेताना मडगाव रेल्वे स्थानकाच्या PI ला रंगेहात पकडले

ACB Raid Konkan Railway: बेळगावातील एका मटणाच्या व्यापाऱ्याला गोव्यात मांस पुरवठा रेल्वेने केल्याच्या खोट्या प्रकरणात फसवून त्याच्याकडून २ लाखांची खंडणी व दरमहा २५ हजार रुपये हप्त्याची मागणी गुडलर याने केली होती.
konkan railway madgaon railway police station
madgaon railway police stationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिवसेंदिवस बदनाम होत चाललेल्या पोलिस खात्याच्या वर्दीला सुनील गुडलर याच्या रुपाने आणखी एक कलंक लागला आहे. यापूर्वी अनेक 'पराक्रम' नावावर असलेल्या हा कोकण रेल्वे पोलिस स्थानकाच्या निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) सोमवारी (२१ एप्रिल) रात्री लाच घेताना रंगेहात पकडले. त्याच्यासह हेड कॉन्स्टेबल मोहम्मह हुसेन यालाही अटक करण्यात आली आहे.

बेळगावातील एका मटणाच्या व्यापाऱ्याला गोव्यात मांस पुरवठा रेल्वेने केल्याच्या खोट्या प्रकरणात फसवून त्याच्याकडून २ लाखांची खंडणी व दरमहा २५ हजार रुपये हप्त्याची मागणी गुडलर याने केली होती. या व्यापाऱ्याकडून २५ हजार रुपयंची लाच घेताना 'एसीबी'ने कारवाई केली. या दोघांच्या निलंबनाची शिफारस पोलिस खात्याकडे गुन्ह्याचा अहवाल पाठवून करण्यात येणार.

konkan railway madgaon railway police station
Costao Movie: "गोव्यातील त्या मृत्यूसाठी मला दोषी ठरवण्यात आलं" कॉस्ताव चित्रपटाबद्दल बोलताना काय म्हणाले फर्नांडिस?

गेल्या ३० मार्चला 'गोवा एक्स्प्रेस' रेल्वेने मडगावात आलेला मांसचा साठा रेल्वे पोलिसांनी जप्त केला होता. यासंदर्भात रेल्वे पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुनील गुडलर याने बेळगावात मटण विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याशी संपर्क साधून मडगावात रेल्वेतून जप्त करण्यात आलेला मांसाचा साठा त्याचा असल्याचे सांगून पुरावा असल्याची धमकी दिली. "गुन्हा दाखल झालेला नको असेल तर २ लाख रुपये दे. तसेच तुझा हा बेकायदा मांसपुरवठा व्यापार सुरू राहण्यासाठी दरमहा २५ हजार रुपये द्यावेत," अशी धमकी त्याने दिली होती.

कोणताही गुन्हा न करता खंडणी वसुली करण्याची धमकी निरीक्षक गुडलर देत असल्याची लेखी तक्रार या व्यापाराने एसीबीकडे दाखल केली. या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. दरम्यान, रेल्वेतून वाहतूक झालेला व मडगाव येथे सापडलेल्या मांसाच्या साठ्याशी तक्रारदार व्यापाऱ्याचा काहीच संबंध नसल्याचे प्रथमदर्शनी एसीबीला आढळून आल्याने हा सापळा रचून गुडलरला रंगेहाथ पकडण्यात आले.

konkan railway madgaon railway police station
Illegal IPL Betting: गोवा पोलिसांकडून आरोपी 'हिट विकेट'! कळंगुटमध्ये 1 लाखांहून अधिक बेटिंगचा मुद्देमाल जप्त

असा रचला सापळा

१) स्थानकातील हेड कॉन्स्टेबल हुसेन याने सदर व्यापाऱ्याला मोबाईलवरून २५ हजार रुपये घेऊन रेल्वे पोलिस स्थानकात येण्यास सांगितले. यावेळी संवाद साधताना हुसेन याने पोलिस निरीक्षक सुनील गुडलर याने बोलावले असल्याचे सांगितले.

२) व्यापारी व हुसेन या दोघांमधील संवाद रेकॉर्ड करण्यात आला. तो आवाज हेड कॉन्स्टेबल हुसेन याचाच असल्याचे स्पष्ट झाले.

३) त्यामुळे सोमवारी संध्याकाळी रेल्वे पोलिस स्थानकावर छापा टाकण्यात आला. तेव्हा तेथे निरीक्षक गुडलर, हेड कॉन्स्टेबल हुसेन तसेच तक्रारदार व्यापारी उपस्थित होता.

४) व्यापाऱ्याने २५ हजारांची रोख रक्कम निरीक्षक गुडलर याच्याकडे दिली होती. ती त्याने त्याच्या टेबलाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवली होती. ती जप्त करण्यात आली.

५) आता त्याच्या उपस्थितीत घराची झडती घेतली जाणार आहे व बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com