Bhoma Road Issue  Dainik Gomantak
गोवा

Bhoma Road Issue: "देव खाप्रेश्वराला बाजूला केले, आता आमच्या देवदेवतांनाही बाजूला करण्याचे षडयंत्र सुरू", भोमवासीयांना सावध राहण्याचं आवाहन

Bhoma Gram Sabha: भोमवासीयांना गावातून चौपदरी रस्ता नको, बगल मार्ग हवा आहे, असा पुनरूच्चार करीत भोमवासीयांची एकजूट कायम राहील, अशी ग्वाही दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: भोमवासीयांचे रक्त जमिनीवर सांडू देऊ नका, गावाचे अस्तित्व राखण्यासाठी उभारलेला लढा कधीच मागे घेतला जाणार नाही, शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार रविवारी भोम येथे आयोजित करण्यात आलेल्या भोमवासीयांच्या सभेत घेण्यात आला. भोमवासीयांना गावातून चौपदरी रस्ता नको, बगल मार्ग हवा आहे, असा पुनरूच्चार करीत भोमवासीयांची एकजूट कायम राहील, अशी ग्वाही दिली.

भोम येथील या सभेत संजय नाईक, रामा काणकोणकर, डॉ. रुबिन डिसोझा तसेच वामन प्रियोळकर किशोर नाईक, शांतू भोमकर, मारियान व इतरांनी आपले विचार व्यक्त करताना गावातून चौपदरी महामार्ग नकोच, आम्हाला बगल मार्ग हवा असल्याचा पुनरूच्चार केला.

संजय नाईक यांनी भोमवासीयांचा हा लढा अखंड आहे, त्यात फूट घालण्याचा कुणीही प्रयत्न केला तरी हा लढा सुरूच राहणार असल्याची ग्वाही देत बिल्डर लॉबीसाठी सरकारने भोम गाव गहाण टाकू नये. भोम गावचे अस्तित्व राखण्यासाठी भोमवासीय एकजुटीने काम करीत असून शेवटपर्यंत ही एकजूट कायम राहील, असे सांगितले.

डॉ. रुबीन डिसोझा म्हणाले की, खोर्ली आणि भोम गावाच्या अस्तित्वावर संकट आले आहे. चौपदरी महामार्ग करताना गावातील वाहतुकीसाठी बाजूला सात मीटर रस्ता सोडण्यात येईल. मात्र ही जमीन कुठे आहे, याप्रकरणी सरकारला जाब विचारूया.

रामा काणकोणकर यांनीही गावाच्या अस्तित्वासाठी एकजुटीने पुढे या असे आवाहन करताना कुणीही फूट घालण्याचा प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही, असे सांगितले. यावेळी शांतू भोमकर तसेच वामन प्रियोळकर, किशोर नाईक व इतरांनी आपले विचार व्यक्त करताना भोमातून चौपदरी रस्ता नकोच, असा धोषा लावला.

खाप्रेश्‍वर देवासारखी स्थिती होईल...

पर्वरी येथील देव खाप्रेश्‍वराला बाजूला केले, त्याप्रमाणे गावातील देवदेवतांनाही बाजूला करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. त्यामुळे भोमवासीयांनी सावध व्हावे आणि या लढ्याला पूर्ण पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपस्थितांनी केले. देव खाप्रेश्‍वराचा कोप संबंधितांवर झाल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी भोमवासीयांनी सांगितले.

दामू नाईक यांनी भोम गावात यावे!

भारतीय जनता पक्षाचे नूतन अध्यक्ष दामू नाईक यांनी भोम गावात यावे आणि येथील स्थिती पाहावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दामू नाईक यांनी गोमंतकीयांच्या हिताचे निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे. मात्र, भोमवासीयांवर सरकारकडून घाला घातला जात आहे. आमच्यासोबत भोमातील नियोजित रस्त्यासंबंधी ‘डिबेट’ करा असे आव्हानही यावेळी भोमवासीयांकडून देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT