Romtamel Goa Bhom Dainik Gomantak
गोवा

Romtamel: ‘घुमचे कटर घूम – वाजय बडय नाचय...’! लोककलांचा विलक्षण जल्लोष

Romtamel Goa Bhom: कार्यक्रमातील वेशभूषा स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. वेशभूषा सादर होताच, छोट्या मुलांना मिळणार्‍या खास भेटवस्तूमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

संजय घुग्रेटकर

भोम येथील ‘सत्यम शिवम सुंदरम नाट्य संपदा संस्था’ व कला आणि संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झालेला ‘घुमचे कटर घूम – वाजय बडय नाचय...’ हा ढोल, ताशा वादनासह सादर झालेला बहारदार रोमटामेळ विलक्षण रंगला. छोट्या मुलांच्या विविध प्रकारच्या वेशभूषा कार्यक्रमाने या सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. श्री सातेरी देवीच्या पवित्र प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला लाभलेली हजारोंची उत्स्फूर्त उपस्थिती, त्यांचे लोककलेप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करत होती.

ग्रामीण भागातील लोककलांना व्यासपीठ मिळावे, नवोदित कलाकारांना संधी मिळावी आणि पारंपरिक कला जतन व्हाव्यात या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात सांस्कृतिक चैतन्य निर्माण झाले होते. कार्यक्रमातील वेशभूषा स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. वेशभूषा सादर होताच, छोट्या मुलांना मिळणार्‍या खास भेटवस्तूमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

३ ते १५ वर्ष वयोगटातील चिमुकल्यांनी राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, कृषी, बाजार आणि कौटुंबिक विषयांवर आधारित वेशभूषा सादर करत उपस्थितांची मने जिंकली. झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण, राखणदार, शेतकरी, कामगार, बाजारवाली, नारळ काढणारा अशा विविध भूमिका मुलांनी समर्पक सादर केल्या. त्यांच्या अभिनयातील आत्मविश्वास, संवादफेक आणि वेशभूषेतील बारकाव्यांना प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट लाभत होता.

या सोहळ्यात रंगलेल्या लोकनृत्य स्पर्धेने कार्यक्रमाला चार चांद लावले. बोरीचे अवेडेकर समाज शिमगोत्सव मंडळ, डोंगरी शिमगोत्सव मंडळ, शिरोड्याचे मंडलेश्वर शिमगोत्सव मंडळ, खांडेपार शिमगोत्सव मंडळ, वेलिगचे ओंम श्री सदगुरू मंडळ, हिंदवी स्वराज्य देववाडी शिमगोत्सव मंडळ, कळंगुटचे शांतादुर्गा शिमगोत्सव मंडळ, सांग्याचे पाईकदेव शिमगोत्सव मंडळ तसेच धारबांदोड्याचे श्री पिसानी शिमगोत्सव मंडळ या विविध पथकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

पारंपरिक ढोल-ताशा, घुमट, वादन आणि नृत्य लयीत सादर करत प्रत्येक पथक लोककलेच्या समृद्ध परंपरेचे जणू वाहन करत होता. त्यांच्या रंगतदार आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. हा सारा कार्यक्रम सुमारे पाच तास चालला, तरीही प्रेक्षक शेवटपर्यंत खुर्चीला खिळून राहिले.

कारण प्रत्येक सादरीकरणात काहीतरी वेगळेपण आणि आकर्षण होते. स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आल्यामुळे दूरवरूनही अनेक पथकांनी सहभाग घेतला होता. “घुमटे कटर घूम” हा कार्यक्रम भोम परिसरासाठी केवळ एक सांस्कृतिक सोहळा नव्हता, तर लोकपरंपरा, कला आणि एकतेचा उत्सव ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT