Bhausaheb Bandodkar  Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमध्ये भाऊसाहेब बांदोडकर जयंती उत्साहात

आम्ही शर्यतीत मागे पडलो: लोबो

दैनिक गोमन्तक

कळंगुट: राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन्न करण्यासाठी आमचे प्रयत्न होते, परंतु या शर्यतीत आम्ही मागे पडलो आहोत. त्यामुळे सध्यातरी आमच्यापुरती ही शर्यत संपलेली आहे. मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून एक सच्चा कॉँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहणार असून कळंगुटबरोबरच राज्यातील प्रत्येक मतदार संघातील समस्यांना धरणे, आंदोलनाद्वारे वाचा फोडणार आहे, असे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात लोबो बोलत होते. कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, उपसरपंच शेरॉल लोबो, श्री बाबरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नागवेंकर, पंचायत मंडळाचे इतर सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला नाकारण्याचे कारण विचारले असतां लोबो म्हणाले, आपण काँग्रेस पक्षात नवीन असल्याने यावर पक्षाच्या वरिष्ठांनी अधिक भाष्य करणेच योग्य ठरेल. परंतु तिसवाडी बार्देश पेक्षा कॉँग्रेस दक्षिणेत विशेष करून सासष्टीत कमी पडली. भाऊसाहेब बांदोडकरांमुळे गरीब जनतेला मुंडकार कायद्याद्वारे राहत्या घराचा हक्क आणि कसेल त्याची जमीन कायद्याद्वारे शेताचा मालकी वाटा प्राप्त झाला. भाऊसाहेब बांदोडकर ट्रस्टचे डायस, प्रतिभा नार्वेकर, सरपंच शॉन मार्टीन्स, चंद्रकांत चोडणकर यांची भाऊसाहेबांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारी भाषणे झाली. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नागवेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT