Goa Today's Live Update| Goa Politics | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: महिला मोर्चा हे भाजपचे बळ

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री: महिलांच्याच ताकदीवर दक्षिणेतील उमेदवार जिंकणार

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant:

भारतीय जनता पक्षाने देशातील महिलांना स्वाभिमानी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत दहा वर्षांत ज्या योजना कार्यान्वित केल्या, त्या महिलांवर केंद्रित होत्या. महिला मोर्चा हेच भारतीय जनता पक्षाचे बळ असल्याचे व दक्षिण गोव्यातील भाजपचा उमेदवार महिलांच्या ताकदीवर जिंकेल,

असे मुख्यमंत्री डॉ़. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्यातील महिला मोर्चाच्या वेगवेगळ्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना सांगितले.

पंतप्रधानांनी सुरू केलेले स्वच्छता अभियान, हर घर शौचालय, सेनिटरी पॅड, हर घर जल सेवा, पंतप्रधान जन आरोग्य कार्ड, गॅस कनेक्शन, बेटी बचाव बेटी पढाव, सुकन्या समृद्धी योजना या सर्व योजना महिला केंद्रीतच आहेत. भाजपला केंद्रात तिसऱ्या कार्यकाळासाठी संधी मिळाली, तर देशाला विश्र्वगुरू बनविण्याच्या दिशेन पाऊले टाकली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आगामी निवडणूक सहजपणे घेऊ नका. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे सर्वांचेच लक्ष्य असावे, असे सांगितले. जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा प्रभू तेंडुलकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला भाजपचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, सरचिटणीस नरेंद्र सावईकर, दामू नाईक, भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत उपस्थित होत्या. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष आरती बांदोडकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

‘सरकार धर्मावर चालते हा प्रचार चुकीचा’

महिला कार्यकर्त्यांची एवढी मोठी संख्या पाहून आपण भारावलो आहे व दक्षिण गोव्यातील भाजपचा उमेदवार निश्र्चितच जिंकेल हे आताच स्पष्ट दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महिलांवर मोठी जबाबदारी आहे. त्यात बूथ बलवान करणे, मतदारांना पंतप्रधान मोदींच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देणे याचा समावेश आहे.

भाजपचे केंद्र किंवा राज्य सरकार धर्मावर चालते असा जो प्रचार केला जातो, तो चुकीचा आहे. सरकार नारी, युवा व किसान शक्तीवर तसेच गरीब कल्याणावर चालते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

SCROLL FOR NEXT