Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्‍यात महिला उमेदवारीवर पक्षश्रेष्‍ठी ठाम

Lok Sabha Election 2024: पल्‍लवी धेंपे यांचे नाव जवळपास निश्‍चित
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Dainik Gomantak

Lok Sabha Election 2024:

दक्षिण गोव्‍यात महिलेलाच उमेदवारी देण्‍यात यावी, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासह भाजप पक्षश्रेष्‍ठींचा आग्रह असून ते या निर्णयावर ठाम असल्‍याचे दिसून येते. या सर्व घडामोडीत उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्‍या पत्‍नी पल्‍लवी धेंपे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.

दक्षिण गोव्‍यातून महिलेलाच उमेदवारी द्यावी, अशी सूचना केंद्रीय नेतृत्‍वाने आम्‍हाला केली आहे, अशी कबुली गोव्‍याचे प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली. तर आज मडगावात महिला माेर्चाच्‍या संमेलनावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, दक्षिणेत उमेदवार महिला असो वा पुरुष, जो काही निर्णय होणार, तो उद्या (रविवारी) दिल्‍लीत होणार आहे. कुणालाही उमेदवारी मिळो, दक्षिण गोव्‍याची जागा भाजप किमान ६० हजारांच्‍या मताधिक्‍क्‍याने जिंकेल, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करत उमेदवारीबाबतचे गूढ कायम ठेवले.

Lok Sabha Election 2024
Goa Farming: आफ्रिकी काजूंच्या निकृष्ट दर्जामुळे गोव्याची बदनामी

त्‍यापूर्वी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिल्‍लीत रविवारी जी बैठक होणार आहे, त्‍या बैठकीला आम्‍हाला बोलावून घेतले जाईल, असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी सांगितले. मात्र, आज (शनिवारी) सायंकाळपर्यंत

मुख्‍यमंत्री किंवा प्रदेशाध्‍यक्षांना या बैठकीचे आमंत्रण देण्‍यात आले नव्‍हते. असे जरी असले तरी रात्री उशिरा किंवा रविवारी सकाळी त्‍यांना हे आमंत्रण मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला जात आहे.

महिलांसाठी अजूनही अधिकृतरित्‍या आरक्षण देण्‍यात आले नसले, तरी आम्‍ही आरक्षण नसतानाही १७० महिलांना निवडणुकीत उभे केले, हा संदेेश देऊन भाजप सरकारला एक मास्‍टरस्‍ट्रोक मारायचा आहे. त्‍यातून महिलांना खूष करण्‍याबरोबरच संपूर्ण जगात भाजप हा महिलाविरोधी नाही, हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायचा आहे. याच मोहिमेचा एक भाग म्‍हणून दक्षिण गोव्‍याकडे पाहिले जाते.

Lok Sabha Election 2024
Goa Tourism: जाणून घ्या, गोव्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी कोणता?

पल्‍लवी धेंपे या मूळ मडगावच्‍या असल्‍याने आणि त्‍या प्रसिद्ध अशा तिंबले घराण्‍यातील असल्‍याने लाेकांचा त्‍यांना पाठिंबा मिळेल. तसेच भाजप कार्यकर्त्यांच्‍या जोरावर दक्षिण गोव्‍यातून त्‍यांना निवडून आणणे फारसे जड जाणार नाही, असे ठाम मत भाजप श्रेष्‍ठींनी बनविले आहे, असे सांगितले जाते.

लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, हे अद्याप मी ठरविलेले नाही. मात्र, भाजपकडून दक्षिण गोव्‍याची उमेदवारी कुणाला मिळणार हे उद्याच (रविवारी) स्‍पष्‍ट होणार आहे.

- पल्‍लवी धेंपे.

माझी पत्नी पल्लवी धेंपे हिला दक्षिण गोव्यातून लोकसभेची उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. मला ही माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारेच समजली. पल्लवी तिचे निर्णय स्वत:च घेते. उमेदवारी मिळण्याबाबत तिच्याशी अधिकृतरित्या संपर्क झाला आहे की नाही, याची माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही.

- श्रीनिवास धेंपे, उद्योजक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com