Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: आभिमानास्पद ! आशियातील सर्वात मोठ्या भारत रंग महोत्सवात गोव्यातील नाटकांचा डंका

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेच्यावतीने भारत रंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यात गोव्यातील दोन नाटकांची निवड झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: देशपातळीवर आणि आशियातील सर्वात मोठी भारत रंग महोत्सवात गोव्यातील दोन संस्थांच्या नाटकांचा समावेश झाला आहे. त्यात रुद्रेश्‍वर पणजी आणि रुद्रास स्टुडिओ लॅब्रोट्रीज या संस्थांची ही नाटके असल्याची माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गावडे यांच्याबरोबर प्रा. दीपक आमोणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

गावडे म्हणाले की, कोरोनामुळे दोन वर्षे हा महोत्सव झाला नाही. यंदा होणाऱ्या या महोत्सवात गोव्यातील दोन नाटकांचा समावेश होतो, हा नाट्य क्षेत्राचा बहुमान आहे. अशा निवडलेल्या नाटकांचे सादरीकरण करणाऱ्या संस्थांचा गौरव करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.

प्रा. आमोणकर म्हणाले, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेच्यावतीने भारत रंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यासाठी विशिष्ट पद्धतीची निवड प्रक्रिया असते. त्यातून नाटकांची निवड केली जाते. यावर्षी 700 नाटकांच्या प्रवेशिका आल्या होत्या.

त्यातून गोव्यातील दोन नाटकांची निवड होणे, ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय गटात ‘सोल टू सोल'' मराठी नाटक अनुवाद कोकणी आणि इंग्रजीत केला आहे. कोलंबो (श्रीलंका) येथे या नाटकाचे सादरीकरण झाले आहे.

राष्ट्रीय गटात ‘विश्‍वमित्र'' हे रुद्रेश्‍वर पणजीने सादर केलेले नाटक आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत हे प्रथम ठरले आहे. भारत रंग महोत्सवात विविध भाषेतील व देशांतील नाटकांच्या प्रवेशिका येतात, त्यातून या नाटकांना मिळालेली मोठी पावती आहे, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT