cm pramod sawant dainik gomantak
गोवा

Bharat Rang Festival Goa: नाट्यरसिकांसाठी पर्वणी! ‘नागमंडल’ नाट्यप्रयोगाने गोव्यात ‘भारत रंग’ महोत्सवाला सुरुवात; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

Cultural Festivals In Goa: गोव्यात चार दिवस चालणाऱ्या ‘भारत रंग’ नाट्यमहोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.‌

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यात चार दिवस चालणाऱ्या ‘भारत रंग’ नाट्यमहोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.‌ या प्रसंगी बोलताना त्‍यांनी या महोत्सवात मराठी नाटकांबरोबरच कोकणी नाटकानांही स्थान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

तत्पूर्वी, या नाट्यमहोत्सवाचे आयोजक असलेल्या राष्ट्रीय नाट्यविद्यालयाचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी यांनी सर्वांचे स्वागत करताना या नाट्यमहोत्सवाबद्दल मौलिक माहिती उपस्थितांसमोर ठेवली. ‘भारत रंग’ नाट्यमहोत्सव आज जगातील सर्वांत मोठा नाट्यमहोत्सव बनला आहे या त्यांच्या विधानाचे स्वागत उपस्थितांनी केले. उद्घाटन समारंभानंतर चंदीगडच्या सात्त्विक आर्ट सोसायटी’ या संस्थेने महोत्सवातील पहिले नाटक, ‘नागमंडल’ सादर केले.

उद्‌घाटन समारंभाला एक तास विलंब

या महोत्सवाचा उद्‌घाटन समारंभ ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ६ वाजता सुरू होण्याऐवजी या कार्यक्रमाचे उद्‌घाटक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) उशिरा आल्यामुळे ७ वाजता सुरू झाला. अस्वस्थ झालेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून आभार प्रदर्शनाचे भाषण संबंधित वक्त्याला आवरायला लावले. 

पालशेतची विहीर(मराठी) लेखक : विजयकुमार नाईक दिग्दर्शक : दीपक आमोणकर 

‘पालशेतची विहीर’ हे नाटक, पहिल्या महिला मराठी नाट्य लेखिका हिराबाई पेडणेकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. तिने आपल्या आयुष्यात ज्या खस्ता खाल्ल्या त्याचे चित्रण या नाटकात केले गेले आहे. तत्कालीन (१९वे शतक) नाट्यक्षेत्रात जी पुरुषप्रधान, प्रतिगामी वृत्ती बोकाळली होती त्याच्यावरही हे नाटक प्रकाश टाकते. हिराबाई यांनी नाट्यक्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी सुधारणावादी विचारांचा अवलंब केला.

दिग्दर्शक म्हणतात

एका निर्णायक वळणावर हिराबाई यांच्या मनात उसळत असलेले मूक प्रश्‍‍न आणि तिचे आंतरिक संवाद याचा मागोवा हे नाटक घेते. तिचा आनंद, तिचे दुःख आणि चिंतन यांची कौशल्यपूर्ण वीण घालत तिच्या अंतर्विश्वाची झलक हे नाटक देते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT