Manish Jadhav
गोवा म्हटलं की, इथली मोहिनी घालणारी निसर्ग राजी डोळ्यांसमोरुन तरुळून जाते. पण या निसर्गराजीबरोबर इथली समुद्ध अशी खादसंस्कृतीही मोहवून टाकते.
गोव्यात येणारा पर्यटक इथल्या गोवन फूडची चव चाखल्याशिवाय राहत नाही. गोवन मसाल्यांमधील अस्सल फूडची चव काही औरचं आहे.
आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून 'गोवा फूड अँड कल्चरल फेस्टिव्हल 2025' बाबत जाणून घेणार आहोत.
गोव्याच्या पर्यटन विभागाकडून 3 जानेवारी ते 5 जानेवारी या कालावधीत गोवा फूड अँड कल्चरल फेस्टिव्हल 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही देखील या कालावधीत गोव्यात असाल तर जरुर या फेस्टिव्हलला हजेरी लावा.
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खवंटे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी (3 जानेवारी) फेस्टिव्हलचा उद्धाटन समारंभ पार पडला.
गोवा फूड अँड कल्चरल फेस्टिव्हल हा गोव्याच्या समृद्ध अशा खाद्यसंस्कृतीचा वारशाचा उत्सव आहे. गोव्याला फूड डेस्टिनेशन म्हणून सादर करण्याची ही संधी आहे.
4 जानेवारी रोजी म्हणजे शनिवारी गोव्याच्या कलासंस्कृतीचं दर्शन घडणार आहे. नवोदित कोकणी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.