arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मोटरसायकलवरून आले, मंगळसूत्र खेचून पळाले; दागिने पुण्यात जप्त, 8 महिन्यांनंतर दोघा चोरट्यांना अटक

Bhamai pali crime: डिचोली पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक कृष्णा गावस आणि रश्मीर परब मातोंडकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने पुणे येथे ही कारवाई केली.

Sameer Panditrao

डिचोली: भामई - पाळी येथील महिलेच्या गळ्यातील हिसकावलेल्या मंगळसुत्रासह सुमारे २.२ लाख रुपयांचे सुवर्णालंकार डिचोली पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवाजीनगर - पुणे येथील एका सोनाराकडून हे दागिने जप्त केले आहेत.

डिचोली पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक कृष्णा गावस आणि रश्मीर परब मातोंडकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने पुणे येथे ही कारवाई केली. गेल्यावर्षी ५ डिसेंबर रोजी भामई - पाळी येथील सानिका शंकर नाईक (वय ४३) या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि अन्य एक दागिना मिळून २.२ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करण्याची घटना घडली होती.

मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी सानिका यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि अन्य दागिना खेचून पळ काढला होता. त्याच दिवशी सानिका यांनी डिचोली पोलिसात तक्रार दाखल केली होती.

दोघा चोरट्यांना आठ महिन्यांनंतर अटक

मंगळसूत्र खेचून पळ काढलेल्या संशयित चोरट्यांना तब्बल आठ महिन्यांनी डिचोली पोलिसांनी अटक केली आहे. मंगळसूत्र चोरीप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी अटक केलेल्या अब्बास अस्लम जैदी (ठाणे-महाराष्ट्र) आणि शरीफ एस. शमशेर (नाशिक) या संशयितांनी भामई-पाळी येथील महिलेचे मंगळसूत्र आणि अन्य एक दागिना पळवल्याचे पोलिस तपासात उघड झाल्यानंतर डिचोली पोलिसांनी दोघांही संशयितांना न्यायालयाकडून बदली वॉरंटवर ताब्यात घेवून नंतर रीतसर अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT