कला अकादमी गोवा आयोजित भजन स्पर्धेचे उद्घाटन करताना वास्कोचे आमदार कृष्णा साळकर. Dainik Gomantak
गोवा

कला अकादमी गोवातर्फे पं. मनोहरबुवा शिरगावकर भजन स्पधेचे आयोजन

कला अकादमी गोवा आयोजित भजन स्पर्धेचे उद्घाटन वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी केले

दैनिक गोमन्तक

वास्को: गोवा ही कलाकारांची खाण आहे. गोव्याच्या मातीत अनेक कलाकार निर्माण होऊन ते आज नावारुपास आले आहे. तसेच गोव्याचे नावलौकीक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. गोव्याच्या समृद्ध अशा भजन परंपरेला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने कला अकादमी गोवातर्फे पं. मनोहरबुवा शिरगावकर भजन स्पधेचे आयोजन करून आपली भजन संस्कृती टीकवून ठेवण्यास मोलाची कामगीरी केली आहे.

(Bhajan competition organized by Kala Academy Goa)

तसेच कला अकादमी गोवाच्या या उपक्रमातून अनेक लहानापासून वृद्धापर्यंत कलकार तयार झाले आहेत. यासाठी कला अकादमी गोवा अभिनंदनास पात्र असल्याचे प्रतिपादन वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनी केले.

कला अकादमी गोवा आयोजित पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृति विभागीय स्तरावरील केंद्र क्र.६ वरील आयोजित पुरुष कलाकार भजन स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष दिपक नाईक, कला अकादमीचे कार्यक्रम व विकास अधिकारी प्रदीप गावकर, कार्यक्रम अधिकारी संजीव झमेॆकर, स्पर्धेचे परीक्षक परशुराम काणकोणकर, रामदास पिळर्णकर, संजीव खांडेपारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार श्री साळकर म्हणाले की राज्य सरकारने कलाकारांसाठी अनेक योजना आखल्या असून त्याचा कलाकारांनी फायदा घेण्याचे आव्हान साळकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार'ला घाबरून विद्यार्थी घरात, शाळेत गेलेच नाहीत; तोरसे, पत्रादेवी येथे पुन्‍हा बागायतींत मुक्त संचार

Virat Kohli Gautam Gambhir Controversy: विराट-गंभीरमध्ये पुन्हा बिनसलं? ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ पाहून चाहते चक्रावले! Watch Video

Goa Factory Fire: नेसाई औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरीला भीषण आग! अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचली 10 लाखांची मालमत्ता; मोठा अनर्थ टळला

Horoscope: पैशांचा पाऊस! डिसेंबर महिना 'या' 4 राशींसाठी लकी; प्रत्येक इच्छा पूर्ण होणार, धनलाभ निश्चित

Goa ZP Elections: 'कमळ' फुलवण्यासाठी 'त्रिसूत्री' रणनीती! मित्रपक्ष मगोसह अपक्षांनाही संधी; मुख्यमंत्र्यांना विजयाची खात्री

SCROLL FOR NEXT