Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Betul: दारूच्या नशेत पोलिसांवर दगडफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण; 6 जणांची पोलिस कोठडीत रवानगी

Betul Police Attack: खणगिणी-बेतूल येथे दारूच्या नशेत पोलिसांवर हल्ला चढविणाऱ्या त्या सहा संशयितांना अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: खणगिणी-बेतूल येथे दारूच्या नशेत पोलिसांवर हल्ला चढविणाऱ्या त्या सहा संशयितांना अधिक तपासासाठी चार दिवसांची  पोलिस कोठडी घेण्यात  आली आहे. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेले पोलिस अनुप कावरेकर यांची प्रकृती सुधारत असून,  त्यांच्यावर  दक्षिण  जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.  

जेबियार डुंग डुंग (२१), सुरेश हरिया (२१), राहुल किसन (२३) व अमित लोहरा  (२५),  संदीप तिरके (३०) व समीर तिरके (२१) अशी संशयितांची नावे आहेत. ते सर्वजण झारखंड राज्यातील आहेत. 

बेपत्ता असलेल्या दोघांना शोधण्यासाठी कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई साईराज नाईक व  अनुप कावरेकर  हे बेतूल येथे गेले होते. त्यावेळी संशयित उघड्यावर दारू पीत बसले होते. पोलिसांनी त्यांना हटकून  जाब विचारला असता, पोलिसांवरच त्यांनी हल्ला चढविला होता.

दगड भिरकावून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या सर्व संशयितांवर   भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, १३२, १८९ (२), १९१ (३) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर वेळीप पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akash Deep: मोठी बातमी! आकाशदीप पहिल्या सामन्यास मुकणार; इशान किशन दुखापतीमुळे बाहेर

Goa Rain: गोमंतकीयांनो काळजी घ्या! मुसळधार पावसाची शक्यता; सावधगिरी बाळगण्याचे निर्देश

Opinion: गाढ वाचेने करू गाढवाचे गुणगान!

Students Stress: न झेपणारे उच्च शिक्षण मुलांवर लादले जातेय का? बुद्धीने ‘कुशाग्र’ असणारी युवापिढी मनाने कमकुवत झाली आहे का?

Goa–London Flight: गोवा-लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार! गोमंतकीयांसाठी खुशखबर; Air Indiaची मिळणार सेवा

SCROLL FOR NEXT