Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Instagram Crime: इन्स्ट्राग्रामवरून युवतींना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांची फसवणूक करणारा साई सुनिल दळवी हा मुरलेला गुन्हेगार असून त्याच्या विरोधात तब्बल पाच अजामीन वॉरंट जारी आहे.
Assault Goa Doctor Arrested
Assault Case GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: इन्स्ट्राग्रामवरून युवतींना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांची फसवणूक करणारा साई  सुनिल दळवी  (२८) हा मुरलेला गुन्हेगार असून त्याच्या विरोधात तब्बल पाच अजामीन वॉरंट  जारी आहे. त्याच्यावर बलात्काराचाही  गुन्हा नोंद असून सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

मडगाव पोलिसांनी त्याला अटक करून पाच दिवसांचा रिमांड घेतला होता. रिमांडची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले असता दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  फसवणूक, दरोडा तसेच बलात्कार प्रकरणाचा गुन्हा त्याच्यावर नोंद आहे.

एकूण सहा गुन्हे त्याच्या नावावर नोंद आहेत. कोलवा, डिचोली व अन्य भागात त्याने हे गुन्हे केले होते.  एका प्रकरणात त्याला अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. या प्रकरणी त्याच्यावर न्यायालयात खटला चालू असून त्याच्याविरोधात या गुन्ह्यासाठी जामीन पात्र वॉरंटही आहे.  पाजीफोंड मडगाव येथील ममता जय सिंग राजपूत या चोवीस वर्षीय युवतीला ३ लाख ३० हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी  मडगाव पोलिसांनी साईच्या मुसक्या आवळल्या होत्या. 

Assault Goa Doctor Arrested
Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

तो मूळ  कुडचडे येथील मोरेले  येथील आहे. सोशियल मीडियाचा गैरवापर करून तो विशेषता युवतींना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांना फसवित होता.  राजपूत या युवतीकडे त्याने  इन्स्टाग्रामवर मैत्री करून नंतर तिची होंडा एक्टिवा दुचाकी विकू, चांगली रक्कम मिळेल, असे भासवून तिला ३ लाख ३० हजार रुपये दे असे सांगितले.

Assault Goa Doctor Arrested
Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नंतर ती युवती फसली होती.  ४ एप्रिल १६ एप्रिल दरम्यान फसवणुकीची घटना घडली होती त्या पाच जणांना पोलिस ठाण्या आणून त्यांची चौकशी केली असता या गुन्ह्यात त्यक्ष सहभाग नसल्याचे आढळून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com