Goa Bethora Nirankal Road Dainik Gomantak
गोवा

Goa Road Issue: बेतोडा-निरंकाल रस्त्याची दुर्दशा, अपघाताला निमंत्रण; दुरुस्तीची मागणी

Bethora Nirankal Road: बेतोडा ते निरंकाल हा अरुंद रस्‍ता वीज खात्‍याने मधोमध खोदला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

बेतोडा ते निरंकाल रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. या रस्‍त्‍याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी निरंकाल येथील समाजसेविका इनासिना आझावेदो यांनी केली आहे.

आझावेदो यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेतोडा ते निरंकाल हा रस्ता मुळातच अरुंद आहे आणि आता सध्‍या हा रस्‍ता वीज खात्‍याने मधोमध खोदला आहे. त्‍यामुळे त्‍यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून राहते. त्‍यामुळे वाहचालकांना विशेषत: दुचाकीस्‍वारांना अपघात होत आहेत.

शिवाय या खड्ड्यांतील पाणी पादचारी किंवा दुचाकीस्‍वारांवर उडत असल्‍यामुळे बाचाबाची होऊन मारामारीपर्यंत घटना पोहोचल्‍या आहेत.

यासंदर्भात बेतोडा निरंकाल सरपंच मधू खांडेपारकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, खोदलेल्या काही खड्ड्यांमध्‍ये दगड घालून डांबरीकरण करण्‍यात आले होते. पण लगेच पाऊस सुरू झाल्‍याने ही स्‍थिती उद्‌भवली.

बेतोडा ते निरंकाल रस्त्याची तातडीने दुरुस्‍ती करणे गरजेचे आहे. याबाबत मी संबंधित खात्याशी पत्रव्यवहार केला आहे. याची दखल खात्याने घेऊन तातडीने उपाययोजना करावी.
इनासिना आझावेदो, समाजसेविका (निरंकाल)
लोकांनी आणखी दोन-तीन महिने कळ सोसावी. पावसाळ्‍यानंतर हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे हॉटमिक्‍स डांबरीकरण करण्‍यात येईल. तरीसुद्धा तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.
मधू खांडेपारकर, सरपंच (बेतोडा-निरंकाल)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT