Bethora Panchayat News Dainik Gomantak
गोवा

Bethora: झुडपे कापण्यासाठी मागितली परवानगी, प्रत्यक्षात प्लॉट पाडून विकले; बेतोड्यात गैरकृत्यांना ऊत

Bethora Illegal Activities: बेतोडा भागातील एका जमिनीत झुडपे कापणे तसेच सिमेंटचे खांब उभारण्यासाठी पंचायतीकडे संबंधिताने परवानगी मागितली होती.

Sameer Panditrao

फोंडा: बेतोडा कोनशे कोडार निरंकाल पंचायत क्षेत्रात बेकायदा प्लॉट तयार करण्याबरोबरच इतर गैर कृत्ये चालली असून संबंधित सरकारी यंत्रणेने त्याची चौकशी करावी अशी मागणी बेतोडा भागातील ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी देवेंद्र च्यारी, धर्मानंद च्यारी, ज्ञानेश्‍वर खांडेपारकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

बेतोडा भागातील एका जमिनीत झुडपे कापणे तसेच सिमेंटचे खांब उभारण्यासाठी पंचायतीकडे संबंधिताने परवानगी मागितली होती, पण प्रत्यक्षात या ठिकाणी प्लॉट तयार करून ते विकण्यात आले. यासंबंधीची तक्रार पंचायतीत करण्यात आली आहे, पण अपेक्षित कारवाई झालेली नाही, असे यावेळी सांगण्यात आले. पूर्ण पंचायत मंडळच या गैरकृत्यात गुंतल्याचा दावा करण्यात आला.

नाला बुजवून बांधकाम!

बेतोडा भागातील एक नाला बुजवून बांधकाम सुरू असून पावसाळ्यात या ठिकाणी पाणी इतरत्र घुसून पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या कामामुळे मोठी समस्या निर्माण होणार असल्याचा दावा करण्यात आला. पंचायत क्षेत्रात काही ठिकाणी बेकायदेशीर घरक्रमांक देण्यात आले आहेत, त्याचीही चौकशी करण्यात यावी असे सांगून ग्रामसभेत यासंबंधी वेळोवेळी आवाज उठवण्यात येतो, पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT