Best place to live in goa Dainik Gomantak
गोवा

Viral Post: "मी गोव्यात कुठे राहू"? Reddit वर रंगली धमाल चर्चा; नेटकरी म्हणाले, 'घरीच रहा आणि पैसे वाचव..'

Best place to live in goa: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर एका युजरने गोव्यात वास्तव्यासाठी कोणता भाग अधिक योग्य ठरेल, असा प्रश्न उपस्थित केला असून या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

Sameer Panditrao

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर एका युजरने गोव्यात वास्तव्यासाठी कोणता भाग अधिक योग्य ठरेल, असा प्रश्न उपस्थित केला असून या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. संबंधित युजरने दक्षिण गोवा की मध्य गोव्यातील पणजी परिसर — यापैकी कुठे राहणे अधिक सोयीचे ठरेल, याबाबत सल्ला मागितला आहे.

या पोस्टमध्ये त्याने काही विशिष्ट अपेक्षा नमूद केल्या आहेत. राहण्याच्या भागात फूड डिलिव्हरी सेवा उपलब्ध असावी, दैनंदिन गरजेच्या वस्तू सहज मिळाव्यात, चांगली इंटरनेट सुविधा असावी, भाडे किंवा राहणीमानाचा खर्च तुलनेने कमी असावा आणि बेळगावला जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता जवळ असावा, अशा अटी त्याने मांडल्या आहेत. तसेच, तो मूळचा कर्नाटकातील कूर्ग भागातील रहिवासी असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.

या प्रश्नावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने थेट सल्ला देताना, “तू कूर्गमध्येच राहा आणि पैसे वाचव,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या एका युजरने वाळपई परिसराचा पर्याय सुचवत, तुलनेने शांत आणि नैसर्गिक वातावरणाचा उल्लेख केला. मात्र, काही जणांनी अधिक माहितीची गरज व्यक्त केली.

“तुला नेमके गोव्यात का यायचे आहे? नोकरी, व्यवसाय की जीवनशैलीतील बदल? हे कळल्याशिवाय योग्य सल्ला देणे कठीण आहे,” असे एका प्रतिक्रियेत नमूद करण्यात आले.

दरम्यान, या चर्चेमुळे गोव्यातील राहणीमान, वाढते भाडे, पायाभूत सुविधा आणि जीवनशैली यांवरही चर्चा रंगली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून स्थलांतराचे पर्याय शोधण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचेही या निमित्ताने दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ ODI Series: 'हिटमॅन', 'रन मशीन'सह टीम इंडियाची फौज सज्ज, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेपूर्वी पाहा कोणाची आकडेवारी किती दमदार

Airfare Ticket Price New Rules: विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! आता विमान कंपन्या स्वतः ठरवणार तिकिटांचे दर; सरकारी नियंत्रण हटले

Rajasthan Jhunjhunu Accident: भीषण दुर्घटना! रस्त्याचे काम करताना 11,000 व्होल्टच्या विजेचा धक्का; 8 मजुरांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

Gajkesari Rajyog 2026: गुरु-चंद्राची युती घेऊन आली सुवर्णयोग! चार राशींचे भाग्य उजळणार; गजकेसरी योग ठरणार वरदान

8th Pay Commission Pension Hike 2026: पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग ठरणार वरदान, 67 टक्के पेन्शन आणि 50 टक्के फॅमिली पेन्शनची जोरदार मागणी; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT