Goa Police |  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: मुरगाव तालुक्यात पोलिसांची उत्तम कामगिरी

वर्षभरात सातपैकी 6 खुनांच्‍या गुन्‍ह्यांचा छडा; चोरीच्‍या प्रकरणांचाही उलगडा

दैनिक गोमन्तक

Goa Police: मुरगाव तालुक्यात पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे. सरत्या वर्षात सात खुनांसह बलात्कार, घरफोड्या चोऱ्या असे अनेक प्रकार घडले. यंदा वास्को आणि मुरगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दोन खून झाले, तर तीन खून वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडले.

या सात खून प्रकरणांपैकी सहा प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावून आरोपींना गजाआड करून भरीव कामगिरी केली. चिखली येथे आपल्या 14 महिन्यांच्या मुलीचा खून करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न निमिषा गोणे या महिलेने केला. या घटनेने राज्यातील कौटुंबिक ताणतणावाचे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

या राज्याला हादरवून टाकलेल्या खून प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.किरकोळ वादातून झालेले खुनाचे प्रकरणही असेच गाजले. 25 मे 2022 रोजी वास्को पोलिसांनी सिंडीकेट बँकेसमोरून रमेश चव्हाण (30, मूळ रा. महाराष्ट्र) याचा मृतदेह ताब्यात घेतला.

संशयित पृथ्वी चव्हाण (19, रा. वास्को) याने दंडुक्याने रमेशला मारहाण केली होती. या प्रकरणीही पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केला आहे.

19 मे 2022 रोजी नवेवाडे येथील दिया नाईक या 18 वर्षीय युवतीचा दांडेर-वेळसांव समुद्रकिनान्यावर खून करण्यात आला. प्रेमसंबंधांतून नवेवाडे येथीलच 26 वर्षीय किशन कळंगुटकरने दियाचा खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

जुलै महिन्यात वेर्णा औद्योगिक वसाहत परिसरात झालेल्या प्रभू म्हातो (44, मूळ रा. झारखंड) याच्या खूनप्रकरणी वेर्णा पोलिसांनी सतेंद्र म्हातो, गुलाब म्हातो आणि रूपेश म्हातो यांना अटक केली आहे. या प्रकरणीही आरोपपत्र दाखल आहे.

वर्षखेरीस 17 डिसेंबर 2022 रोजी अनैतिक संबंधांतून कन्हैयालाल यादव या ट्रकचालकाने मामेभाऊ संजय यादवचा खून केला. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.

25 लाखांचा माल जप्‍त

मुरगाव तालुक्यात घडलेल्या या 62 विविध चोरी प्रकरणांपैकी 30 प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावून आरोपींना गजाआड केले आहे. सरत्या वर्षातील 62 चोरी प्रकरणांत चोरट्यांनी 1 कोटी 12 लाख 32 हजार 361 रुपयांची मालमता लंपास केली.

पोलिसांनी 25 लाख 81 हजार 700 रुपयांची मालमता जप्त केली. तालुक्यात दिवसाढवळ्या झालेली एकमेव घरफोडी वगळता इतर 13 चोऱ्या रात्री घडल्या.

बलात्‍काराचे प्रकार उघडकीस

मुरगाव तालुक्यात यावर्षी बलात्काराच्या 13 घटना घडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यांपैकी सहा घटना वास्को पोलिस स्थानकाच्या हद्दीत, तर सात वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडल्या आहेत. मुरगाव तालुक्यात यावर्षी नोंद झालेल्या 13 बलात्कार प्रकरणांचा छडा लावून आरोपींना पोलिसांनी गजाआड केले होते, तर तालुक्यातील विविध रस्त्यांवर 22 जीवघेणे अपघात घडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT