Mandvi River Dainik Gomantak
गोवा

मांडवी नदीकिनारी होर्डिंग्स प्रकरणी महापालिकेला खंडपीठाची नोटीस

मांडवी नदीच्या पलीकडे बेती येथे उभारलेल्या जाहिरातींच्या होर्डिंग्सला परवानगी आहे का ?

दैनिक गोमन्तक

पणजी: मांडवी नदीच्या पलीकडे बेती येथे उभारलेल्या जाहिरातींच्या होर्डिंग्सला परवानगी आहे का व ती नसल्यास पणजी महापालिकेने काय कारवाई केली आहे, असा प्रश्‍न स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीवेळी समोर आला. त्यामुळे पणजी महापालिकेला यासंदर्भात बाजू मांडण्यासाठी प्रतिवादी करण्याचा आदेश व नोटीस बजावून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने देऊन त्यावरील सुनावणी 1 एप्रिलला ठेवली आहे.

राज्यातील रस्त्याच्या बाजूने मोठमोठ्या जाहिरातींचे फलक व होर्डिंग्सप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 2007 साली स्वेच्छा याचिका दाखल करून घेऊन त्यासंदर्भात विविध निर्देश दिले होते. या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याची जनहित याचिका बंधगीत नदाफ यांनी 2011 साली सादर केली होती. ही याचिका मूळ स्वेच्छा याचिकेशी जोडून सुनावणी घेण्यात येत आहे. आज सुनावणीवेळी या स्वेच्छा याचिकेतील ॲमिकस क्युरी यांनी खंडपीठाला एक बाब निदर्शनास आणून देण्यात आली. मोठमोठ्या होर्डिंग्समुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा संभव असतो. मात्र, मांडवी नदीच्या पलीकडे मोठमोठे होर्डिंग्स उभे असल्याने त्यासंदर्भात पणजी महापालिकेकडून माहिती घेण्यासाठी त्यांना प्रतिवादी करण्याची गरज आहे. त्यांनी याप्रकरणी परवानगी दिली आहे का व दिली नसल्यास काय कारवाई केली, ही माहिती जाणून घेण्याची गरज आहे.

न्यायालयाचा आदेशही धाब्यावर

रस्त्यांच्या बाजूने अनेक जाहिरातींचे फलक तसेच होर्डिंग्स उभारल्याने ते त्वरित काढण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने पालिका व पंचायतींना दिले होते. अजूनही काही भागांत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जरी झाली तरी पुन्हा फलक उभारण्यात येतात. मांडवी नदीपलीकडे बेती परिसरात नदी काठावर जाहिरातीचे होर्डिंग्स आहेत. रात्रीच्यावेळी या होर्डिंग्सवर विद्युत रोशणाई झकळते. वाहनचालकांचे लक्ष त्याकडे जाते. त्यामुळे हे होर्डिंग्स धोकादायक बनले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT