आमदारांच्या (MLA) अपात्रता याचिकेवरील अंतिम सुनावणी 22 ऑक्टोबरला Dainik Gomantak
गोवा

आमदारांच्या अपात्रता याचिकेवर खंडपीठात 22 ऑक्टोबरला सुनावणी

2019 मध्ये मगोपच्या तीन आमदारांपैकी (MLA) दीपक पाऊसकर (Deepak Pauskar) आणि मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी आमदारकीचा राजीनामा न देता तसेच मगोप भाजपमध्ये विलीन झाल्याचा दावा करून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेस (Congress) व मगो पक्षातून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या 12 आमदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा (Goa) खंडपीठात दाखल केलेल्या आमदार (MLA) अपात्रता याचिकेवरील अंतिम सुनावणी 22 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर (Girish Chodankar) तर मगोपतर्फे सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी होणार आहे.

2019 मध्ये मगोपच्या तीन आमदारांपैकी दीपक पाऊसकर आणि मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी आमदारकीचा राजीनामा न देता तसेच मगोप भाजपमध्ये विलीन झाल्याचा दावा करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याला ढवळीकर यांनी आव्हान दिले आहे. गिरीश चोडणकर यांनीही काँग्रेसच्या तत्कालीन दहा आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका सादर केली आहे. काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फुटले तरी मूळ काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन झालेला नाही. जर पूर्ण पक्षच दुसऱ्या पक्षात विलीन झाला तर त्या आमदारांची आमदारकी अबाधित राहू शकते, अशी लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे हे सर्व 10 आमदार अपात्र ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT