पणजी : 12 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सभापती राजेश पाटणेकर यांनी काँग्रेस व मगोने सादर केलेल्या याचिका फेटाळल्यानंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ‘ये तो होना ही था’ अशा शब्दात प्रथम प्रतिक्रिया व्यक्त केली. सभापतींचा हा अपेक्षित निवाडा जो गोमंतकीय जनता कदापी स्विकारणार नाही. सत्य नेहमीच प्रबल होते. काही दिवसांची वाट पाहवी लागणार, न्याय मिळणारच.( Goa After rejecting the petition of ineligible MLAs saying Yeh to hona hi tha)
भारतीय राज्यघटना सर्वोच्च असून, कुठलीही शक्ती ती बाजूला सारु शकत नाही, अशी प्रतिक्रिया कामत यांनी व्यक्त केले.कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी करणारी याचिका सभापतींनी आज फेटाळून लावली. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ही याचिका सादर केली होती.
नीळकंठ हळर्णकर, आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा, आंतोनिओ फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा, क्लाफासिओ डायस, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज आणि चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर या आमदारांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या विषयावर आता २२ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.