Mickey Pacheco Dainik Gomantak
गोवा

नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांचा राष्ट्रवादीला रामराम

''फक्त सासष्टीतील राजकारणावर लक्ष केंद्रित करणार''

दैनिक गोमन्तक

मडगाव: 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत आलेले बाणावली व नुवेचे माजी आमदार मिकी पशेको यानी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.

(Benaulim Former MLA Mickey Pacheco quits NCP)

गोव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाना भवितव्य नाही. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार परत एकदा भाजपात जाऊ पाहत आहेत. राष्ट्रवादी पक्ष गोव्यात मुळच धरू शकत नाही. यामुळे या दोन्ही पक्षाशी संबंध ठेवणे म्हणजे राजकीय आत्महत्या करण्यासारखे आहे. त्यासाठी या दोन्ही पक्षाशी अंतर ठेवून सासष्टीच्या राजकारणात सक्रिय व्हायची आपली इच्छा आहे असे ते म्हणाले.

पाशेको यांनी आपली दुसरी निवडणूक राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारीवर लढवून बाणावली येथून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी या पक्षाला रामराम ठोकून गोवा विकास पार्टीच्या उमेदवारीवर नुवेतून विजय मिळविला होता. 2017 ची निवडणूक हरल्यानंतर 2022 ची निवडणूक बाणावली येथून काँग्रेस उमेदवारीवर लढविण्याच्या आशेवर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता.

ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून 2022 ची विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याबरोबरच ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT