दारुचे दुकान बंद करत उघडले वाचनालय

वांते सत्तरी येथील नितिन शिवडेकर यांचा प्रयोग
Navchetna Pragati Manch
Navchetna Pragati ManchDainik Gomantak
Published on
Updated on

गुळेली: नवचेतना प्रगती मंच वांते सत्तरी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितिन शिवडेकर यांनी आपल्या घराजवळ असलेले दारुचे दुकान (बार )बंद करून त्या जागी नुकतेच नवचेतना प्रगती मंच वाचनालय वांते सुरु केल्याने याभागात त्यांचे कौतुक होत आहे.

(Vantem Sattari, 'Navchetna Pragati Manch' closed a liquor shop and opened a library)

या नवचेतना प्रगती मंच वाचनालय वांते चा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सरकारी माध्यमिक विद्यालय अडवई सत्तरीच्या मुख्याध्यापिका आजरा अन्सारी उपस्थित होते.तसेच प्राॅग्रेस विद्यालय साखळीच्या शिक्षिका तथा सामाजिक कार्यकर्त्या,वक्त्या दया संजय तेंडुलकर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच वांते भागातील प्रथम डॉक्टर डॉ.यवंती यशवंत गावडे,शिक्षक शांबा गावडे, विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष महादेव गावडे,नवचेतना प्रगती मंचचे अध्यक्ष नितीन शिवडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या मुख्याध्यापिका आजरा अन्सारी म्हणाल्या की मुलांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे त्यासाठी वाचन महत्वाचे आहे मोठमोठ्या शहरातमध्ये ही सेवा उपलब्ध असते पण ग्रामीण भागात याचा अभाव असतो अशा प्रकारचा उपक्रम हाती घेऊन मुलांना एक वेगळी वाचनाची संधी गावात उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी संस्थेचे त्यांनी कौतुक केले.

प्रमुख वक्त्या दया तेंडुलकर म्हणाल्या की समाजासाठी काही तरी वेगळं करण्याचा ध्यास काही मोजकेच लोक उराशी बाळगतात त्यातील शिवडेकर एक आहे.त्याच्या प्रयत्नानी हे वाचनालय या ठिकाणी उभे राहीले आहे त्याचा फायदा निश्चितच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल . नवचेतना प्रगती मंचतर्फे राबवण्यात येणारे अशा प्रकारचे उपक्रम इतरांना प्रेरणा देत राहील असे त्या म्हणाल्या.

यावेळी बोलताना नवचेतना प्रगती मंचचे अध्यक्ष नितीन शिवडेकर म्हणाले की आज या ठिकाणी वाचनालय सुरू केलं याचा मला आनंद आहे याजागी आजोबांनी सुरु केलेलं दारुचे दुकान होते ते आपण बंद केले व हे वाचनालय सुरू केले.कला व सांस्कृतिक संचालनालयाच्या वाचनालय या योजनेचा लाभ घेऊन हे वाचनालय सुरू केले यासाठी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले असे या वेळी ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Pollution Control Board report
Narendra Sawaikar Post Controversy
Salman Khan Goa project news
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com