Belgaum road detour through Khanapur Dainik Gomantak
गोवा

Goa Belgaum Road: चोर्लाघाट-बेळगाव रस्त्याबाबत मोठी अपडेट; या मार्गावरुन प्रवास करण्यापूर्वी बातमी वाचा

Chorla Ghat to Belgaum Route: कुसमुळी येथे नवीन पुलाच्या पहिल्या तीन कमानींचा स्लॅब झाला आहे. उर्वरित तीनसाठी महिन्याभरात स्लॅब घालण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

Chorla Ghat to Belgaum Road

खांडोळा: जांबोटी-बेळगाव महामार्ग रविवारी (ता.२५) आज दुपारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे चोर्ला घाटमार्गे बेळगावला जाणाऱ्यांना जांबोटीपर्यंतच प्रवास करता येतो. पुढील रस्ता बंद असल्यामुळे खानापूरमार्गे बेळगावला जावे लागते. त्यामुळे गोमंतकीय प्रवाशांना थोडे अधिक अंतर कापावे लागत आहे.

कुसमुळी येथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी पर्यायी रस्ता केला आहे; मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे देवाचीहट्टी आणि तोराळी बंधाऱ्याच्या फळ्या काढल्या आहेत. अचानक पाणी वाढल्याने पाणी कुसमुळी पुलावर आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जांबोटी-बेळगाव महामार्गावरील वाहतूक बंद करून जांबोटी-खानापूरमार्गे वळविण्यात आली.

कुसमुळी येथे नवीन पुलाच्या पहिल्या तीन कमानींचा स्लॅब झाला आहे. उर्वरित तीनसाठी महिन्याभरात स्लॅब घालण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यायी रस्ता केला आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे साहजिकच पश्चिम भागात पाण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे तोरोळी आणि देवाचीहट्टी येथे बंधाऱ्याला पाणी आल्यामुळे फळ्या काढल्या आहेत. दुसरीकडे पर्यायी रस्ता असणाऱ्या जागी पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने धोका उद्‍भवण्याची शक्यता असल्याने जांबोटी-बेळगाव रस्ता बंद करण्यात आला आहे. हब्बनहट्टी- बैलूर-बेळगाव असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला.

गोवेकरांची तारांबळ!

शनिवारी गेलेल्या गोवेकरांना रविवारी गोव्यात येणे कठीण झाले. काहींनी खानापूर-अनमोडमार्गे गोवा गाठला तर काहींना खानापूर-जांबोटी- चोर्ला मार्गाने गोव्यात यावे लागले. रविवारी हा रस्ता बंद केल्यामुळे गोवेकरांची तारांबळ उडाली. गेल्या चार दिवसातील पावसामुळे मलप्रभा नदीत पाणी वाढल्याने नदीतून तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू होती. हा रस्ता धोकादायक बनल्याने वाहतूक बंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT