Belgaum Goa Highway Crime: बेळगाव-गोवा महामार्गावर असलेल्या तिरणेघाट पुलाखाली एका अंगणवाडी सेविकेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेह आढळलेल्या सेविकेच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा असल्याने हा हत्या झाल्याचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त होत आहे. रामनगर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे (Women) नाव अश्विनी पाटील (वय 50 वर्षे) असून, त्या पेशाने अंगणवाडी सेविका होत्या. महामार्गालगतच्या तिरणेघाट पुलाखाली एका बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर रामनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की, मृतदेह आढळून आलेले ठिकाण पाहता हा अपघात नसून खुनाचा प्रकार असावा, असा संशय बळावला आहे. कारण मृत अश्विनी पाटील यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा (Head and Facial Injuries) आढळून आल्या आहेत. या जखमा अपघातामुळे झाल्या नसून त्या कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने किंवा जोरदार प्रहारामुळे झाल्या असाव्यात, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
अश्विनी पाटील यांचा खून करुन त्यांचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुलाखाली फेकला गेला असावा, असा पोलिसांना (Police) दाट संशय आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामनगर पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद (ADR) केली असली, तरी त्यांनी तपासाची दिशा हत्येच्या दिशेने वळवली आहे.
रामनगर पोलीस अश्विनी यांच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. मृतदेह अशा निर्जन ठिकाणी आढळल्यामुळे गुन्हेगारांनी हे कृत्य खूप विचारपूर्वक केले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट लवकरच अपेक्षित असून या प्रकरणातील गूढ उलगडण्यास मदत होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.