Anmod Ghat Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

Belagavi - Goa Road: रामनगर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने मार्गावर अडकून पडलेला ट्रक हटवला अखेर १७ तासांनी मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे.

Pramod Yadav

Anmod Ghat Belagavi - Goa Road

रामनगर: अनमोड घाटातील वाहतूक कोंडी तब्बल १७ तासानंतर फुटली असून, गोवा - बेळगाव मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. रामनगर येथील घाटात वळणावर रविवारी सांयकाळी साडे पाचच्या सुमारास संरक्षक कठड्याला धडकून ट्रकचा अपघात झाला.

यानंतर घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अखेर १७ तासांनंतर मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

ट्रकचा पाटा तुटल्याने नियंत्रण सुटलेला ट्रक संरक्षक कठड्याला जाऊन धडकला. यामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. रामनगर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने मार्गावर अडकून पडलेला ट्रक हटवला अखेर १७ तासांनी मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे.

रविवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर सुमारे पाच तास वाहने जागच्या जागी उभी होती. अखेर रात्री साडे दहा नंतर हळुहळू एक - एक वाहन सोडण्यात आले. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिस रात्रभर प्रयत्न करत होते. अखेर दुपारी या प्रयत्नांना यश आले.

अनमोड घाट प्रवासाचा एक प्रमुख मार्ग (Anmod Ghat)

बेळगाव - गोवा मार्गावर रामनगर येथे अनमोड घाट येतो. कर्नाटक आणि गोव्याला जोडणारा हा एक प्रमुख मार्ग आहे. मार्गावर नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. घनदाट झाडीचा प्रदेश, नागमोडी वळणे आणि रुंदीने छोटा असणारा मार्ग यामुळे या भागात वारंवार अपघाताच्या घटना पाहायला मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aropra Nightclub Fire: रोमिओ लेन प्रकरणात 'बेली डान्सर' अडकली! केलं कायद्याचं उल्लंघन; क्रिस्टीनाला 'काम' करण्याची परवानगी नव्हती?

IND vs SA: 'जस्सी जैसा कोई नहीं!' बुमराहने 'शतक' ठोकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज! VIDEO

अग्रलेख: निष्काळजीपणा नव्हे, सदोष मनुष्यवध! हडफडे दुर्घटनेने हादरवलं; नियमभंगाच्या कुबड्यांवर तग धरलेली व्यवस्था

माणुसकीशून्य कोडगेपणा! तत्परतेसाठी 25 लोक जळून मरायची वाट का पाहिली? देशभर नाचक्की झाल्यावर 'इभ्रत' राखण्याची मोहीम- संपादकीय

Arpora Nightclub Fire : हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

SCROLL FOR NEXT