Goa Beef Smuggling Dainik Gomantak
गोवा

Beef Smuggling: ‘बीफ तस्करी’ची पाळेमुळे दिल्लीत! पोलिसांना हाती महत्त्वाचे धागेदोरे; लवकरच प्रकरण उलगडणार

Beef Smuggling Through Railway: दिल्लीतून गोव्यात अनेकदा बीफ पुरवठा केला जात असून तेथील बीफ माफियांचा या तस्करीला वरदहस्त असल्याचे आढळून आले आहे.

Sameer Panditrao

मडगाव: गोव्यात रेल्वेतून   पार्सलद्वारे  आलेल्या बीफची  पाळेमुळे दिल्लीत असून, दिल्लीला तपासासाठी गेलेल्या कोकण रेल्वे पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत.

पोलिस पथक  गोव्यात परतले आहे.  दिल्लीतून  गोव्यात अनेकदा बीफ पुरवठा केला जात असून तेथील बीफ माफियांचा या तस्करीला वरदहस्त असल्याचे आढळून आले आहे.  लवकरच या सर्व बाबींचा पर्दाफाश होण्याची पोलिसांना आशा आहे.  दिल्लीला गेलेल्या या पथकाने   तेथील रेल्वे पार्सल कार्यालयाचे  कमिशनर, अधीक्षक यांचीही जबानी नोंद करून घेतली आहे. 

कोकण रेल्वे पोलिसांनी  नवी दिल्लीतून  हजरत रेल्वे स्टेशन येथून रेल्वेतून मडगावात आलेल्या पार्सलमधील  १ लाख ५४ हजारांचे बीफ जप्त केले होते. चिकन पार्सलचे  लेबल  लावून एकूण ५१४.५ किलो बीफ पार्सलमधून आले होते.  हे पार्सल गोव्यात रेल्वेतून पाठवून देण्यात आले होते. मडगाव  रेल्वे स्थानकात या पार्सलची डिलिव्हरी घेण्यासाठी  फय्याज अहमद मोहम्मद हनीफ केनगेनावर हा आला असता त्याला नंतर कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.   

फय्याज  हा रेल्वेतून पार्सलमधून आलेले बीफ गोव्यात अन्य ठिकाणी जाऊन त्याची डिलिव्हरी करत होता, असेही  आतापर्यंतच्या  तपासात उघड झाले आहे.  सध्या तो जामिनावर सुटला  आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT