Sea Dainik Gomantak
गोवा

किनारे होताहेत अरुंद; ‘गोंयच्या रापणकारांचो एकवोट' ने सरकारकडे केलीय 'ही' मागणी, नक्की काय आहे प्रकरण...

दक्षिणेत स्‍थिती बिकट : किनारे बनले अरुंद; उपाययोजना करण्‍याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Beach दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात सध्‍या धूप सुरू आहे. त्‍यामुळे स्‍थानिक मच्‍छीमार तसेच ग्रामस्‍थ हैराण झालेले आहेत.

अजून पावसाने म्‍हणावा तसा जोर धरला नसला तरी भरतीच्‍या वेळी समुद्राच्‍या मोठ-मोठ्या लाटा किनाऱ्यावरील रेतीवर येऊन आपटतात. त्यामुळे रेतीची धूप होत असून किनारे रुंदीने लहान होत चालले आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.

सरकारने याचा अभ्यास करावा व त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. ‘गोंयच्या रापणकारांचो एकवोट’चे अध्यक्ष आग्नेल रॉड्रिगीस यांच्या म्हणण्याप्रमाणे समुद्रकिनाऱ्यांवर अशा प्रकारची मातीची धूप याआधी कधी अनुभवली नव्हती.

यंदा तर परिस्थिती खूपच बिकट आहे. ही गंभीर बाब असून पर्यावरणमंत्र्यांना याबद्दल पत्र लिहून आपण माहिती दिली आहे. तर, मोबोर समुद्रकिनाऱ्यावर याचा जास्त परिणाम झालेला दिसतोय, असे केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी सांगितले.

कोलवा सिविक ॲण्ड कन्झ्युमर फोरमचे ज्युडिथ आल्मेदा यांनीही हीच भीती व्यक्त केली. किनाऱ्यांवरील वाळूची तेंब माणसांनी नष्‍ट केली आहेत. त्‍याचे परिणाम आता माणसालाच भविष्‍यात भोगावे लागतील असेही आल्मेदा म्हणाले.

समुद्रकिनाऱ्यांवर अशा प्रकारची मातीची धूप याआधी कधी अनुभवली नव्हती. यंदा तर परिस्थिती खूपच बिकट आहे. ही गंभीर बाब असून पर्यावरणमंत्र्यांना याबद्दल पत्र लिहून माहिती दिली आहे. - आग्नेल रॉड्रिगीस, ‘गोंयच्या रापणकारांचो एकवोट’चे अध्यक्ष

प्रत्येक वर्षी किनाऱ्यांची धूप होत असून आम्हाला त्‍याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. सरकारने योग्य उपाययोजना केली नाही तर समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील घरांमध्‍ये शिरण्याची भीती आहे. - जेजूस डिकॉस्‍टा, पारंपरिक मच्छीमार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

SCROLL FOR NEXT