पणजी: गोव्याचे उन्हाळ्यातील सर्वसाधारण कमाल तापमान 34 अंशावर असते. मात्र काही वेळा अशा घटना घडतात, की त्यामुळे उष्ण वारा वाहू लागतो. उत्तर कोकण किनारपट्टी तसेच गुजरात येथून उष्ण वारा वाहत होता. तसेच पूर्व दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह देखील अधिक होता, त्यामुळे गोमंतकीयांना गेल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा अनुभव घ्यावा लागला,असे वैज्ञानिक एम.राहुल यांनी सांगितले. (Goa Weather news updates)
गोव्याच्या हवामानाबद्दल सांगताना वैज्ञानिक एम.राहुल म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील तापमान वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. कधी-काधी वाऱ्याच्या प्रवाहाने तापमानात वाढ किंवा घट होते, काही वेळा विशिष्ट क्षेत्रात ढग अच्छादलेले असतात. त्यामुळेही तापमानात वाढ किंवा घट होत असते.
तापमानवाढ चिंताजनक !
यंदा मार्च महिन्यात कमाल तापमान 37 अंशावर पोहोचले. 2013, 2009 व 2008 साली देखील असे तापमान वाढले होते. वर्षातून एकदोन वेळा तापमानात वाढ होणे सामान्य बाब आहे. मात्र गेल्या शंभर किंवा साठ वर्षांचा तपशील पाहिला असता, तापमानात एक-दोन अंशांनी किंवा 0.5 अंशांनी सातत्याने तापमान वाढत आहे. ही तापमानवाढ चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हवामानविषयक जागृती काळाची गरज
गेल्या दशकभरात हवामानात झालेले बदल सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेला आहे. हवामानाबद्दल लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत साऱ्यांनाच हवामानाचे महत्त्व समजावे, हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, याविषयी समाजात जागरूकता पसरावी, या हेतूने 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.