Bcom Student Theft: शिक्षणासाठी काकाच्या घरी राहणाऱ्या एका बी.कॉम. (B.Com) चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने तब्बल 65 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरीच्या पैशांतून तिला गोवा ट्रीप (Goa Trip) करायची होती. एवढचं नाहीतर एका मित्राच्या व्यवसायात गुंतवणूकही (Investment) करायची होती, अशी माहिती कोथाणूर पोलिसांनी (Kothanur Police) दिली. पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करुन चोरीचा छडा लावला.
दरम्यान, सचिथा (Sachitha) असे या मुख्य आरोपी विद्यार्थिनीचे (Student) नाव असून, ती बंगळूरुमध्ये (Bengaluru) आपल्या काकाच्या घरी राहून शिक्षण घेत होती. मे महिन्यात तिने काकांच्या घरातून 65 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. हे दागिने तिने आपला मित्र आणि वर्गमित्र असलेल्या यशवंतला (Yeshwanth) दिले. दोघेही एका खासगी कॉलेजमध्ये बी.कॉम.चे शिक्षण घेत होते.
दागिने मिळाल्यानंतर यशवंतने ते विकून पैसे मिळवण्यासाठी आपले मित्र तनुष (Tanush) आणि रामप्रकाश (Ramprakash) यांना दिले. आरोपींनी काही सोने वितळवून गोव्यातील एका व्यक्तीला विकले. यातील काही रक्कम यशवंतने त्याच्या भविष्यातील योजनांसाठी गुंतवली.
चोरीचा हा प्रकार जून महिन्यात समोर आला. 9 जून रोजी घराचे मालक श्रीनिवास (Srinivas) यांना घरातील दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. सुरुवातीला त्यांनी घरातील मोलकरणीवर संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी (Police) तक्रारीच्या आधारे मोलकरणीची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी सचिथाला बोलते केले. सखोल चौकशीत सचिथाने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या कबुलीजबाबच्या आधारे पोलिसांनी यशवंत आणि त्याचे इतर दोन मित्र तनुष आणि रामप्रकाश यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे दागिनेही हस्तगत केले आहेत.
दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सचिथा आणि यशवंतला कोर्टात हजर केले असता, त्यांना जामीन (Bail) मंजूर झाला आहे. तर इतर दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. एका क्षुल्लक कारणासाठी एका विद्यार्थिनीने एवढ्या मोठ्या चोरीचे पाऊल उचलल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.