Bastora Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Bastora Fire Incident: मुले शाळेत, आई-वडील कामावर अन् मागे सगळंच संपलं! सोन्याचे दागिने, कपडे अन् अन्नधान्य जळून खाक; दुर्घटनेत कुटुंबाचे नुकसान

Bastora House Fire: बार्देश तालुक्यातील बस्तोडा येथे शुक्रवारी सकाळी एका घराला भीषण आग लागून भाड्याने राहणाऱ्या कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: बार्देश तालुक्यातील बस्तोडा येथे शुक्रवारी सकाळी एका घराला भीषण आग लागून भाड्याने राहणाऱ्या कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. या दुर्घटनेत मौल्यवान सोन्याचे दागिने, कपडे, अन्नधान्य तसेच अन्य घरगुती साहित्य आगीत भस्मसात झाल्याने संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

म्हापसा अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक रहिवासी दिगंबर पिळणकर यांनी त्यांच्या घराचा एक भाग भरत विश्वकर्मा यांना भाड्याने दिला होता. नेहमीप्रमाणे विश्वकर्मा दाम्पत्याने सकाळी दोन्ही मुलांना शाळेत पाठवून घराला कुलूप लावले आणि ते कामावर निघून गेले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आर्थिक फटका!

आगीत कपडे, अन्नधान्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून गेले. तसेच स्टीलच्या डब्यात सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिनेही आगीत नष्ट झाल्याने विश्वकर्मा कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला. आगीच्या झळा घराच्या इतर भागापर्यंत पोहोचल्याने घरमालक दिगंबर पिळणकर यांच्याही मालमत्तेचे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT