Power outages in Ponda Dainik Gomantak
गोवा

Bardez: बार्देश तालुक्‍यात 'या' काळात होणार बत्तीगुल; सकाळी 6 नंतर वीजपुरवठा असेल बंद

विद्युत विभागाने दिले 'हे' कारण

दैनिक गोमन्तक डिजिटल

उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यात उद्या दिनांक 6 पासून डिसेंबर एक आठवडाभर वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहित नुकतीच विद्युत विभागाने दिली आहे. या काळात आवश्यकतेनुसार लोडशेडिंग केले जाणार असल्याचे ही विद्युत विभागाने म्हटले आहे.

(Bardez Taluka will be power outage from December 6 to 12)

मिळालेल्या माहितीनुसार बार्देज तालुक्‍याला पॉवर ग्रीडद्वारे केला जाणारा वीजपुरवठा वीजवाहिनी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने ठराविक वेळेत खंडीत केला जाणार आहे. यामध्ये दुरुस्ती कारणास्तन म्हापसा केंद्रावर ( Kholhapur- Mapusa Line 2 circuit ) दुरुस्ती केली जाणार आहे.

दिनांक 6 ते 12 डिसेंबर या कालावधीत वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. तसेच विज बंद असण्याची वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल अशी माहित विद्युत विभागाने दिली आहे.

विद्युत विभागाने दुरुस्तीच्या काळात संपूर्ण विजभार एका सर्किटमधून पुरवणे आवश्यक असल्याने आवश्यकतेनुसार लोडशेडिंग करावे लागणार असल्याची ही माहिती देताना म्हटले आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी इतर वेळी वीजपुरवठा सुरळीत असल्याने नागरीकांना पाणी पुरवठा अथवा इतर लाईटवर अवलंबून असणारी कामे वेळेच्या मर्यादा पाळत पुर्ण करता येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT