bardez Dainik Gomantak
गोवा

Bardez Rain Update : बार्देशला सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा; पडझडीमुळे सुमारे १० लाखांची हानी

Goa IMD : यावेळी काहींच्या घरांचे पत्रे देखील वाऱ्यामुळे उडून गेले. याशिवाय, हळदोणे व नास्नोळा भागांत गुरुवारी रात्री खंडित झालेला वीजपुरवठा हा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पूर्ववत झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा बार्देश तालुक्याला सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. पडझडीमुळे सात घरांवर झाडे कोसळल्याने सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. तसेच वीजवाहिन्या व खांब तुटून वीज खात्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

यावेळी काहींच्या घरांचे पत्रे देखील वाऱ्यामुळे उडून गेले. याशिवाय, हळदोणे व नास्नोळा भागांत गुरुवारी रात्री खंडित झालेला वीजपुरवठा हा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पूर्ववत झाला.

उपलब्ध माहितीनुसार, गुरूवारी रात्री ११ व शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसामुळे सोसाट्याचा वारा आला. परिणामी अनेक ठिकाणी पडझड झाली. म्हापसा अग्निशमन दलाकडे एकूण ६९ झाडे कोसळण्याची कॉल्स नोंद झाली.

या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका कोलवाळ, रेवोडा व थिवी गावांना बसला. म्हापसा शहरासह शिवोली, हणजूण, कामुर्ली, सिरसई, पर्रा, गिरी, पीर्ण या भागात झाडे कोसळली.

कांदोळी येथे मिलाग्रीन फर्नांडिस यांच्या घरावर झाड कोसळून २ लाखांचे नुकसान झाले. कोलवाळ येथे बर्डे यांच्या घराचे १ लाखांचे नुकसान झाले. राण्याचे जुवे येथे राणे कुटूंबियांच्या घरावर माड कोसळला. माळीवाडा रेवोडा येथे प्रमोद गावकर, करक्याचो व्हाळ रेवोडा येथे संतोष पेडणेकर, सांगोल्डा येथे जोस लोबो, तसेच पोंबुर्फा येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले.

कोलवाळमध्ये एकूण ११ झाडे कोसळली. गृहनिर्माण वसाहतीमधील काहींच्या घरावरील शेडचे पत्रे उडाले. सरपंच दशरथ बिचोलकर यांनी स्वतः सहा झाडे कापून बाजूला केली. तर इतर झाडे पंच सदस्यांनी पदरमोड करून कुशल कामगारांच्या सहाय्याने कापली.

अनेक ठिकाणी वीज खांब पडले

वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व वीज खांब तुटले गेले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्री खंडित झालेला वीजपुरवठा गुरूवारी दुपारी सुरळीत झाला. दरम्यान, हळदोणे व नास्नोळामधील वीजपुरवठा बरेच तास खंडित राहिला होता. झाडे उन्मळून पडल्याने वीजतारा तुटल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

Investment Fraud: 20.83 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याला नवे वळण; सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनीता रॉड्रिग्जविरुद्ध अटक वॉरंट

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारताचा धमाका! नेमबाजांची एकाच दिवशी पदकांची बरसात; सुचिका तरियालने रचला नवा इतिहास

Babar Azam Captaincy: 'कॅप्टन्सी सोड अन्...!', वसीम अकरमने बाबर आझमची काढली खरडपट्टी; इंग्लंडविरुद्धचा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी

SCROLL FOR NEXT