महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तात्काळ मिळणार वैद्यकीय मदत, गोवा आरोग्य विभागाने घेतला महत्वाचा निर्णय
108 Ambulances Dainik Gomantak

महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तात्काळ मिळणार वैद्यकीय मदत, गोवा आरोग्य विभागाने घेतला महत्वाचा निर्णय

Goa Health Department: रुग्णवाहिका अधिक असल्यास पीडितांपर्यंत पोहोचण्याचा प्रतिसाद वेळ कमी होण्यास मदत होणाराय.
Published on

महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी गोवा आरोग्य विभागाने आपत्कालीन केंद्र स्थापन करण्यासह महामार्गांवर रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. सरकार याबाबत काम करत असल्याची माहिती मंत्री विश्वजित राणे यांनी सभागृहात दिली.

सभागृहात मांडण्यात आलेल्या लेखी उत्तरात राणे यांनी याबाबत माहिती दिली. आरोग्य विभागामार्फत आपत्कालीन देखभाल केंद्र उभारण्यासह आणि महामार्गांवर रुग्णवाहिका तैनात करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असे राणे यांनी म्हटले आहे.

'आरोग्य विभागाने 09 कार्डियाक केअर ॲम्ब्युलन्स आणि दोन निओ नेटल ॲम्ब्युलन्स देखील खरेदी केल्या आहेत आणि 17 अतिरिक्त ॲडव्हान्स लाइफसेव्हिंग ॲम्ब्युलन्सच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे,' अशी माहिती राणे यांनी सभागृहात दिली.

महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तात्काळ मिळणार वैद्यकीय मदत, गोवा आरोग्य विभागाने घेतला महत्वाचा निर्णय
वेतनवाढीच्या निर्देशांची अंमलबजावणी का केली नाही; SC ने गोव्याच्या मुख्य सचिवांकडून मागितले स्पष्टीकरण

आरोग्य विभागाच्या वतीने नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु असून, रुग्णवाहिकांचा ताफा वाढवणार आहे. रुग्णवाहिका अधिक असल्यास पीडितांपर्यंत पोहोचण्याचा प्रतिसाद वेळ कमी होण्यास मदत होणाराय.

108 रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही किंवा सेवा मिळाली नाही अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या का याबाबत उत्तर देताना राणे यांनी 108 रुग्णवाहिका सेवेबाबत गेल्या तीन वर्षात 23 तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com