Babar Azam Captaincy: 'कॅप्टन्सी सोड अन्...!', वसीम अकरमने बाबर आझमची काढली खरडपट्टी; इंग्लंडविरुद्धचा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी

Wasim Akram Slams Babar Azam Captaincy: इग्लंड दौऱ्यावरील पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर आणि संघात झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर पाकिस्तानच्या कर्णधारपदावरुन पुन्हा एकदा वाद पेटला.
Wasim Akram Slams Babar Azam Captaincy
Wasim Akram Dainik Gomantak
Published on
Updated on

Wasim Akram Slams Babar Azam Captaincy: इग्लंड दौऱ्यावरील पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर आणि संघात झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर पाकिस्तानच्या कर्णधारपदावरुन पुन्हा एकदा वाद पेटला. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही कसोटी सामने गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अचानक 7 खेळाडूंना मायदेशी परत पाठवले आणि प्रशिक्षक वर्गातही मोठे फेरबदल केले.

बर्मिंगहॅम येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या नाणेफेकीवेळी जेव्हा बाबर आझम याला या तडकाफडकी बदलांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा आपल्याला या घडामोडींची काहीच माहिती नव्हती असे उत्तर त्याने दिले. बाबरच्या या निष्काळजी उत्तरावर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अकरम भडकला असून त्याने बाबरवर जोरदार टीका केली.

Wasim Akram Slams Babar Azam Captaincy
Babar Azam: देशानं सोडलं, पण परदेशानं स्वीकारलं! पाकीस्तानचा बाबर आझम आता ऑस्ट्रेलियात खेळणार टी-20 क्रिकेट

मँचेस्टरमधील एका कार्यक्रमादरम्यान वकार युनिससोबत उपस्थित असलेल्या वसीम अकरमने बाबर आझमच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. अकरम अतिशय आक्रमकपणे म्हणाला की, जर तुला संघात काय चालले आहे हेच माहीत नव्हते, तर मग तू तिथे काय करत होतात? तू तिथे छोले विकायला गेला होतास का? अशा कडक शब्दांत अकरमने बाबरची शाळा घेतली. अकरमच्या मते, जेव्हा संकटाच्या काळात कर्णधार खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत नाही, तोपर्यंत कोणताही खेळाडू मैदानावर आपले 100 टक्के योगदान देऊ शकत नाही. दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतरच बाबरने स्वतःहून कर्णधारपद सोडून केवळ फलंदाज म्हणून खेळायला हवे होते, असे मत अकरमने मांडले.

Wasim Akram Slams Babar Azam Captaincy
Babar Azam: भारताचं प्रत्युत्तर बघून बाबर आझमची झोप उडली; मोहम्मद अली जिन्नाला आठवत म्हणाला "पाकिस्तानला....."

विशेष म्हणजे, शान मसूदच्या जागी 5 जुलै रोजी बाबर आझमकडे (Babar Azam) दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. यापूर्वी 2020 ते 2023 दरम्यान त्याने 20 कसोटींमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले, ज्यामध्ये 10 सामने जिंकले. दुसऱ्यांदा कर्णधारपद स्वीकारल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली, मात्र इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानची पार दाणादाण उडाली.

Wasim Akram Slams Babar Azam Captaincy
Babar Azam Video Viral: बाबरनं डोक्यात बाटलीच हाणली असती... काय आहे हे 'झिम्बाबर झिम्बाबर' प्रकरण?

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने हेडिंग्ले कसोटी एक डाव आणि 103 धावांनी जिंकली, तर लॉर्ड्सवर 194 धावांनी पराभव करत मालिकेत विजयी आघाडी घेतली. तिसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागल्याने इंग्लंडने पाकिस्तानचा 3-0 असा व्हाईट वॉश केला. या मानहानीकारक पराभवानंतर आता बाबरच्या कर्णधारपदावर टांगती तलवार निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com