Investment Fraud: 20.83 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याला नवे वळण; सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनीता रॉड्रिग्जविरुद्ध अटक वॉरंट

₹20.83 crore investment scam Goa: मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.
Sunita Rodrigues investment fraud
Investment fraud case arrest warrantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे २०.८३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी फरार असलेल्या मायरन रॉड्रीगीस विरुद्धच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली असून याच प्रकरणातील अन्य एक संशयित सुनीता रॉड्रिग्ज हिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. संशयित मायरन न्यायालयात गैरहजर, तर सुनीता भगवंत तन्नाई ऊर्फ सुनीता रॉड्रिग्ज आणि संशयित दीपाली परब ऊर्फ रुक्मिणी नाईकही गैरहजर होत्या.

Sunita Rodrigues investment fraud
Goa Politics: 'गोवा फर्स्ट'चा नारा पुन्हा बुलंद! धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी समविचारी पक्षांना एकत्र आणणार; गोवा फॉरवर्डची भूमिका स्पष्ट

मात्र, काही वेळाने दीपाली परब यांच्या वकिलांनी त्यांना न्यायालयात गैरहजर राहण्यास अनुमती मागितली, तेव्हा न्यायालयाने एका दिवसासाठी ही अनुमती दिली. मात्र, संशयित सुनीता या न्यायालयात गैरहजर असल्याचे पाहून न्यायालयाने तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा आदेश दिला.

आपण गुंतवणूक सल्लागार असल्याचे भासवून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा देऊ, असे सांगून या प्रकरणातील वरील तीन संशयितांनी अनेक गुंतवणूकदारांकडून सुमारे २०,८३,९०,३२६ रुपये इतकी रक्कम जमा केली होती आणि नंतर गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाने पुसली, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

Sunita Rodrigues investment fraud
Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

बँकेत धनादेश वटलेच नाहीत!

संशयित मायरन याने काही गुंतवणूकदारांना धनादेश दिले होते. मात्र, बँकेत अपुरा निधी असल्यामुळे हे धनादेश वटले नाहीत. वरील संशयितांनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com