बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश मडगाव पोलिस स्टेशनाबाहेर टॅक्सी चालकांच्या प्रतिनिधींसमवेत.
बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश मडगाव पोलिस स्टेशनाबाहेर टॅक्सी चालकांच्या प्रतिनिधींसमवेत. Dainik Gomantak
गोवा

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश गोवा माईल्स विरुद्ध तक्रारीच्या पावित्र्यात

दैनिक गोमन्तक

सासष्टी: स्थानीक टॅक्सी चालक व गोवा माईल्स यांच्यामधील मतभेद व भांडण संपणार असे वाटत नाही. स्थानिक टॅक्सी चालकांना पाठिंबा जाहीर करीत बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यानी टॅक्सी चालकांच्या प्रतिनिधीं समवेत मडगावात पोलिस स्टेशनवर जाऊन पोलिस अधिकारी पोलिस उपअधिक्षक संदेश चोडणकर यांची भेट घेतली व त्यांच्याशी या संबंधाने सविस्तर चर्चा केली.

(Banavali MLAs will lodge a complaint against Goa Miles)

गोवा माईल्सचे टॅक्सी चालक कोलवा. बाणावली, वार्का, माजोर्डा येथील हॉटेलांतील पर्यटकांना ने आण करतात व त्यामुळे स्थानिक टॅक्सी चालकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होताना दिसत असल्याचे आमदार व्हिएगश यानी मडगावात पोलिस उपअधिक्षकाच्या भेटी नंतर पत्रकारांना सांगितले.
गोवा माईल्सचे टॅक्सी चालक पर्यटकांना हॉटेलमध्ये सोडतात व नंतर कोलवा, माजोर्डा, बाणावली येथेच थांबतात व नंतर हॉटेलमध्ये जाऊन त्याना घेतात. या विरुद्ध अनेक तक्रारी करूनही त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. आम्ही ही परिस्थिती शांततापुर्ण रितीने सोडविण्याच्या प्रयत्नांत आहेत.

आम्हाला आंदोलन, तोडफोड नको आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणांत लक्ष घालून गोवा माईल्सच्या टॅक्सी चालकांना समज द्यावा असे आपण पोलिस उपअधिक्षकाना सुचविल्याचेही व्हिएगश यानी सांगितले.
तरी सुद्धा हे प्रकरण लवकरात लवकर सोडवले नाही तर कायदा हातात घेतल्याशिवाय आमच्यापुढे दुसरा पर्याय नसणार असेही व्हिएगश यानी पुढे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT