‘चलो बैलपार' जलआंदोलन तात्पुरते स्थगित

पेडणे येथील स्थानिकांनी बंधाऱ्याविरोधात जलआंदोलन पुकारले होते.
Goa Chalo Bailpar Water Agitation temporarily stop
Goa Chalo Bailpar Water Agitation temporarily stopDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: भविष्यात जलसंकट उद्भवू शकते हाच गंभीर प्रश्‍न घेऊन पेडणे तालुक्यातील बैल पार नदीचे पाणी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान स्थानिक स्थानिकांनी 1 मे रोजी चलो बैल पार आंदोलनाची हाक दिली होती. पेडणे येथील स्थानिकांनी बंधाऱ्याविरोधात जलआंदोलन पुकारले होते. बैल नदीत हे जलआंदोलन करण्यात आले होते; दरम्यान हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. (Goa Chalo Bailpar Water Agitation temporarily stop)

Goa Chalo Bailpar Water Agitation temporarily stop
''गोव्यात दुसऱ्या लग्नाचा अधिकार...'' : असदुद्दीन ओवेसी

या ठिकाणी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी भेट घेतली आंदोलकांची भेट घेतली लवकरात लवकर जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचं आश्वासन पार्लेकरांनी दिलं मात्र तोपर्यंत बंधाऱ्याचे काम कायम सुरू राहणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

‘चलो बैलपार जलआंदोलना’ची हाक

पेडणे तालुक्यात भविष्यात जलसंकट उद्‌भवू शकते. याची चाहूल लागल्यामुळे आणि बैलपार नदीचे पाणी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न होत असल्याने आज रविवार दि. 1 मे रोजी ‘चलो बैलपार जलआंदोलना’ची हाक मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जनसंघटनेने दिली होती.

Goa Chalo Bailpar Water Agitation temporarily stop
सुभाष वेलिंगकर दुसरे इन्क्विझिशन आणू पाहात आहेत : फा. व्हिक्टर फेर्रांव

आज सकाळी 11 वाजल्यापासून जलआंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास पर्यावरणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जनसंघटनेचे अध्यक्ष भारत बागकर, सरचिटणीस बया वरक यांनी पत्रकार परिषदेत केले.

बैलपार ही सरकारविरोधी लढाई नाही

बैलपार ही सरकारविरोधी लढाई नसून पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे पेडणे येथील जनतेच्या जीवन मरणाची लढाई आहे, असे समजून लोकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जलआंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जनसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com