Sunburn Music Festival Goa
Sunburn Music Festival Goa Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: गोव्याची प्रतिमा मलिन करणारा 'सनबर्न' गोव्यातून कायमचा हद्दपार करा - हिंदू जनजागृती समिती

Akshay Nirmale

Goa Hindu Janjagruti Samiti: ‘सनबर्न’ फेस्टिव्हलचे आयोजक हरिंद्र सिंग यांनी ‘वर्ष २०२३ मधला गोव्यातला ‘सनबर्न’ महोत्सव माझा शेवटचा ‘सनबर्न’ आहे, अशी ‘पोस्ट’ समाजमाध्यमांत केली होती.

त्यावर हा तर संस्कृतीप्रिय गोमंतकीयांचा विजय आहे, अशी भावना हिंदू जनजागृती समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गोव्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावून पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारा, सामाजिक स्वास्थ बिघडवणारा, युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारा,

अमली पदार्थ व्यवहारासाठी सदैव चर्चेत असलेला आणि गोव्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन करणारा गोव्यातील ‘सनबर्न 2023’ महोत्सव अखेरचा ठरो. सनबर्नच्या आयोजकाने असे मत व्यक्त करणे हा एकप्रकारे संस्कृतीप्रिय गोमंतकीयांचा विजयच आहे.

हिंदु जनजागृती समितीने संस्कृतीद्रोही ‘सनबर्न’ महोत्सवाला प्रारंभापासून विरोध दर्शवला आहे. विकृतीला प्रोत्साहन देणारा आणि युवापिढीला अंमली पदार्थांच्या गर्तेत ढकलणाऱ्या या महोत्सवात अनेक युवकांचा बळी गेला आहे.

युवा पिढीला नासवणारे ‘सनबर्न’/‘ईडीएम’ सारखे फेस्टिव्हल गोव्यातून कायमचे हद्दपार करावेत आणि गोव्याची सांस्कृतिक अस्मिता जपावी, अशी हिंदु जनजागृती समितीची कायम भूमिका आहे. असे विकृत प्रकार गोव्यात पुन्हा येऊ नये म्हणून गोमांतकीयांनी अधिक जागृत रहण्याची आज आवश्यकता आहे.

काय म्हणाले हरिंद्र सिंग?

दरम्यान, सनबर्नचे आयोजक हरिंद्र सिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, डिसेंबर 2023 मधला गोव्यातला हा माझा शेवटचा सनबर्न. हा प्रवास इथेच संपतो आहे... यामध्ये मी अनेकांचा आभारी आहे. या प्रवासात खूप कष्ट घेतले.

अनेक भावना आणि बऱ्याच गोष्टींचा यात समावेश आहे. मी मागील इतकी वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करू शकलो, याचा मला आनंद आहे. पण पुन्हा मी ते करू शकणार नसल्याचे दु:खही आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honeytrap Case: INS हंसा दाबोळीचे फोटो पाकिस्तानला शेअर केल्याचा संशय, मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याची कसून चौकशी

Panaji Murder Case : मालगाडीत झोपले अन् कर्नाटकात पोचले; मराठे खून प्रकरणातील संशयितांचा सिनेस्टाईल प्रवास

Karnataka: 'ते हिंदूंचा द्वेष करतात', काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात पोस्ट करणाऱ्या 'मुंबईच्या डॉन'ला गोव्यातून अटक

Goa Today's Live News: कुर्टी-फोंड्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, नऊ लाखांचे नुकसान

Bicholim News : चित्रकारांना पाठिंबा द्या : चंद्रकांत शेट्ये

SCROLL FOR NEXT