ban liquor Dainik Gomantak
गोवा

मतमोजणी दिवशी मद्यविक्री बंदी: गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

राज्यात या दिवशी मद्यविक्रीवर बंदी असली तरी रेस्टॉरंट्स सुरू ठेवता येतील

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील विधानसभेची मतमोजणी उद्या 10 मार्चला होणार आहे. यानिमित्त गुरुवारी राज्यभरात मद्यविक्री बंदीचा आदेश लागू केला आहे. ही बंदी मतमोजणी सुरू असेपर्यंत सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.मतमोजणी सकाळी 8 वा.पासून ते संपेपर्यंत पणजी व मडगाव येथे तसेच सर्व मतदारसंघामध्ये एकाचवेळी सुरू होणार आहे.

राज्यात या दिवशी मद्यविक्रीवर बंदी असली तरी रेस्टॉरंट्स सुरू ठेवता येतील मात्र मद्यविक्री करता येणार नाही. मतमोजणीपासून सुमारे 200 मीटर अंतराच्या क्षेत्रात कोणत्याही आस्थापनाला तसेच दुकाने खुली ठेवता येणार नाही असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ही मद्यविक्री बंदी उद्या बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार असून ती मतमोजणी संपेपर्यंत असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. या मतमोजणीवेळी आल्तिनो - पणजी येथील तंत्रनिकेतन इमारतीच्या सभोवताली असलेल्या प्रवेशद्वाराबाहेर गर्दी होणार असल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT