Ban on sale of liquor in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 10 मार्चला मद्यविक्रीवर बंदी

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पोलिसांचा चोख बंदोबस्त

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दारु विक्रीवर बंदी घातली आहे. गुरुवारी 10 मार्च रोजी कोणत्याही परवानाधारक आस्थापनाला मद्यविक्री करता येणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. (Ban on sale of liquor in Goa News Updates)

पणजीतील (Panjim) अल्तिन्हो येथे असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन म्हणजेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये उत्तर गोव्यासाठीची विधानसभेची मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात असून राज्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही प्रतिबंधात्मक पावलंही उचलण्यात आली आहेत. याचाच भाग म्हणून आता उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 10 मार्च रोजी दारुच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

दरम्यान संपूर्ण उत्तर गोव्याची (North Goa) मतमोजणी ही पणजीतच होणार असल्याचे चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तसंच अल्तिन्हो परिसरातही काही प्रमाणात निर्बंध लादले जाऊ शकतात. गोवा विधानसभा निवडणुकीचा (Election) निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोषी मिरवणुकाही काढल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आधीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मद्यविक्रीवर निर्बंध आणले आहेत. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी अजून याबाबत निर्देश जारी केले नसले तरीही दक्षिण गोव्यातही मद्यविक्री बंद ठेवली जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT