Ban on sale of liquor for election in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 12 फेब्रुवारीपासून मद्यविक्रीवर बंदी

निवडणूक काळात गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय, कायदेशीर कारवाईची तरतूद

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक पार पडताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काहीकाळ दारुची विक्री करता येणार नाही. गोव्यात 12 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 14 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लावली जाणार आहे. (Ban on sale of liquor for election in Goa News Updates)

निवडणूक झाल्यानंतर 15 फेब्रुवारीपासून गोव्यात मद्यविक्री करता येणार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदिवशी 10 मार्चलाही राज्यात दारुविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या काळात दारुची विक्री होत असल्याचं निदर्शनास आल्यास संबंधित दुकान किंवा बारवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाईसह मद्यविक्रीचा परवानाही रद्द केला जाणार असल्याची माहिती आहे. राज्यात सध्या आचारसंहिता लागू असल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दारुचा साठा जप्त केला जात आहे.

दरम्यान गोव्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे 10.13 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 6.30 कोटींची रोख रक्कम, 2.44 कोटी रुपये किमतीची दारु, 1.06 कोटींचे अमली पदार्थ, 20 लाखांचे महागडे दागिने, तर 30 लाखांच्या भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT