'मुख्यमंत्र्यांचा पराभव करा, सगलानींना मंत्री बनवून साखळीचा विकास घडवा'

गेल्या दहा वर्षात सरकारने केवळ थापा मारल्या, खाणपट्टीत पसरलेल्या बेकारीची कदरच भाजप सरकारने केली नाही; धर्मेश सगलानी
Sankhalim Prithviraj Chavan
Sankhalim Prithviraj ChavanDainik gomantak
Published on
Updated on

साखळी : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचा या निवडणूकीत पराभव करा कॉंग्रेसचे आमदार धर्मेश सगलानी निश्चित मंत्री बनतील व मुख्यमंत्री करु न शकलेला साखळीचा विकास करुन दाखवतील असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साखळी येथे केले.

साखळीचे कॉंग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांच्या प्रचार दौऱ्यावर आले असता साखळी येथील शिवाजी चौकावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रभारी टी रवी यांच्या सोबत आगमन झाले.

Sankhalim Prithviraj Chavan
मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून 'हे' 33 उमेदवार रिंगणात

त्यावेळी त्यांचे कॉंग्रेस (Congress) उमेदवार धर्मेश सगलानी, माजी आमदार प्रताप गावस, माजी नगराध्यक्ष सुनिता वेरेकर, साखळीचे नगराध्यक्ष राया पार्सेकर, उपनगराध्यक्ष राजेश सावळ, नगरसेवक राजेंद्र आमेसकर, माजी सरपंच प्रविण ब्लेगन, माजी सरपंच लक्ष्मणराव देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मीकांत परब, गौरी मळीक, रेणूका देसाई, प्रदीप मळीक, रमेश सिनारी, शांतीलाल आमोणकर, भानुदास सोननाईक, दामोदर केंकरे, अंकुश कामत, संदीप काणेकर, जेष्ठ कार्यकर्ते सदानंद काणेकर आदी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधताना चव्हाण पुढे म्हणाले की, गोव्याच्या विकासात कॉंग्रेस सरकारचा नेहमी मोठा वाटा आहे. गोव्यातील जनतेने नेहमीच कॉंग्रेसलाच पाठिंबा दिलेला आहे. मागच्या निवडणूकीतही गोव्यातील जनतेने भाजपला हाकलून कॉंग्रेसलाच पाठिंबा दिला होता. परंतु भाजपने तोडफोड करुन जनतेच्या विरुध्द अलोकशाही पध्दतीने सरकार बनविले. यंदाच्या निवडणूकीतही यावेळी पुन्हा एकदा कॉग्रेसचे सरकार निवडण्यास गोव्यातील जनता सज्ज झाली आहे परंतु जनतेला आवाहन कॉग्रेसला स्पष्ट बहुमताने सत्ता द्या जेणेकरुन गेल्या पाच वर्षात खोळंबलेला विकास पुढे नेता येईल.

Sankhalim Prithviraj Chavan
पणजीच्या हाय-प्रोफाईल लढाईत, भाजपची ताकद पणाला

धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) म्हणाले की, गोव्यात डबल इंजिन सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खाण व्यवसाय पुन्हा सुरु करण्याच्या केवळ वल्गनाच करण्यात आल्या. गेल्या दहा वर्षात सरकारने केवळ थापा मारल्या. खाणपट्टीत पसरलेल्या बेकारीची कदरच भाजप सरकारने केली नाही. आम्ही घरोघरी भेटी दिल्या त्यावेळी खाणपट्टीतील लोक रडत असल्याचे दिसून आले.

भाजपने (BJP) महागाई प्रचंड वाढवली व सगळीकडे भ्रष्टाचार माजवला. कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास तीन महिन्यात कायदेशीर खाण व्यवसाय पुन्हा सुरु करण्यात येईल. साखळी मतदार संघातील बेकारी नष्ट करण्यासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. साखळी नंतर आमोणा व पाळी भागात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी कॉग्रेस कार्यकर्त्यांसोबत घरोघरी प्रचार व कोपरा बैठका घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com