Dental student bathroom video  Dainik Gomantak
गोवा

Goa Dental College: बाथरूमच्या खिडकीतून आंघोळ करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ केला शूट; बांबोळी डेंटल कॉलेजमधील घटना, विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा

Bambolim Dental College Bathroom Video: आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसतिगृहाच्या सचिवांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sameer Panditrao

Goa Dental College and Hospital

पणजी: बांबोळी येथील दंत महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृह इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीच्या बाथरूमच्या खिडकीतून चित्रीकरण केल्याप्रकरणी आगशी पोलिसांनी याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसतिगृहाच्या सचिवांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ मे २०२५ रोजी रात्री ९.४५ ते १० च्या सुमारास या महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या इमारतीच्या कंपाउंडमध्ये आत घुसला.

त्यानंतर त्याने तळमजल्यावर असलेल्या खोलीच्या बाथरूमच्या खिडकीतून आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनींचे मोबाईलने दुष्ट हेतूने चित्रीकरण तसेच आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीला कोणी तरी खिडकीत असल्याचा अंदाज आला. तिने आरडाओरड केली असताना हा विद्यार्थी कंपाउंडवरून उडी मारून पळाला.

तो पळताना वसतिगृहातील काही विद्यार्थिंनींनी त्याला पाहिले. या घटनेची माहिती वसतिगृह सचिवांच्या निदर्शनास आणून दिल्यावर यासंदर्भात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याने केलेला गुन्हा विद्यार्थिंनीच्या सुरक्षिततेचे तसेच सभ्यतेचे उल्लंघन केले असल्याने पोलिसांनी गंभीरता लक्षात घेऊन तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT