Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Vishwajit Rane: काम २०२६ पर्यंत पूर्ण होऊन इस्‍पितळात रुग्‍णांवर उपचारही सुरू केले जाणार आहेत. इमारतीचे काम पूर्ण झाल्‍यानंतर इतर कामे काहीच महिन्‍यांत पूर्ण करण्‍यात येतील, असे मंत्री राणे म्‍हणाले.

Sameer Panditrao

पणजी: बांबोळी येथील नियोजित कॅन्‍सर इस्‍पितळ आगामी विधानसभा निवडणुकीआधी म्‍हणजेच पुढील वर्षापर्यंत पूर्ण केले जाईल. टाटा मेमोरियल संस्थेशी याबाबत सामंजस्‍य करार करण्‍याची प्रक्रिया सुरू असून या इस्‍पितळात रुग्‍णांवर दर्जेदार उपचार केले जातील, अशी हमी आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

राज्‍यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) तसेच इतर काही खासगी इस्‍पितळांमध्‍ये कॅन्‍सरवरील उपचार केले जातात. परंतु, काही उपचारांसाठी गोव्‍यातील रुग्णांना इतर राज्‍यांमध्‍ये जावे लागते. त्‍यामुळेच राज्‍य सरकारने काही वर्षांपूर्वी बांबोळी येथील गोमेकॉच्‍या परिसरात कॅन्‍सरवर उपचार करण्‍यासाठी टाटा मेमोरियलशी सामंजस्‍य करार करून स्‍वतंत्र इस्‍पितळ उभारण्‍याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सध्‍या या इस्‍पितळाच्‍या इमारतीचे बांधकाम सुरू असून, ३० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम २०२६ पर्यंत पूर्ण होऊन इस्‍पितळात रुग्‍णांवर उपचारही सुरू केले जाणार आहेत. इमारतीचे काम पूर्ण झाल्‍यानंतर इतर कामे काहीच महिन्‍यांत पूर्ण करण्‍यात येतील, असे मंत्री राणे म्‍हणाले.

दरम्‍यान, कॅन्‍सर इस्‍पितळाबाबत राज्‍य सरकार आणि टाटा मेमोरियल यांच्‍यातील सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू आहे. हे इस्‍पितळ कार्यान्‍वित झाल्‍यानंतर त्‍यात कमीत कमी राजकीय हस्‍तक्षेप व्‍हावा, यासाठी या इस्‍पितळाला स्‍वायत्त संस्‍था म्‍हणून ठेवण्‍याचा विचार असल्‍याचे ते म्‍हणाले. केंद्र सरकारने काहीच दिवसांपूर्वी ‘जीएसटी’ स्‍लॅबमध्‍ये बदल करून सर्वसामान्‍य जनतेला मोठा दिलासा मिळवून दिला आहे.

रुग्‍णवाहिकांचा गैरवापर नाही!

आरोग्‍य खात्‍याच्‍या रुग्‍णवाहिकांचा प्रशासकीय कामांसाठी अजिबात वापरल्‍या जात नाहीत. त्‍यामुळे याबाबत नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये. मी पहिल्‍यांदा आरोग्‍यमंत्री झालो, तेव्‍हाच प्रशासकीय कामांसाठी रुग्‍णवाहिकांचा वापर करता येणार नसल्‍याचा नियम खात्‍यात लागू केला होता, असेही मंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 4 वर्षांपूर्वी झोपडीत झाला खून, आरोपींना आधी आजीवन कारावास, नंतर निर्दोष सुटका; काय घडले नेमके? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; पेडण्यातून नवा आमदार?

Goa Cricket: नाबाद 243 धावा, 7 विकेट्स; गोव्याच्या कर्णधाराची अष्टपैलू खेळी; छत्तीसगडवर दणदणीत विजय

Tiger Reserve: 'व्याघ्र संवर्धन' योजना सादर करा! सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; कार्यवाहीसाठी 6 महिन्यांची दिली मुदत

Ranji Trophy 2025: गोव्याची फॉलोऑननंतर पुन्हा धडपड, 150 धावांनी पिछाडीवर; सौराष्ट्र मजबूत स्थितीत

SCROLL FOR NEXT